निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:40+5:302021-04-16T04:08:40+5:30
शैलेश अर्जुनराव कांबळे (५४ रा. उंटखाना) यांचे आसाममध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार ...

निधन वार्ता
शैलेश अर्जुनराव कांबळे (५४ रा. उंटखाना) यांचे आसाममध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार होईल.
ददूराम मुंजेवार ()
ददूराम पांडुरंग मुंजेवार (७७, रा. विलासनगर, जुना बाबुळखेडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
निर्मला पेंडके ()
निर्मला अनंतराव पेंडके (७६ रा. दसरा रोड, गोंधळीपुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वसंतराव थोरात ()
वसंतराव नारायणराव थोरात (७९, रा. वर्धा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.
नारायणराव खेरडे ()
नारायणराव मारोतराव खेरडे (८५) यांचे निधन झाले. ते जलसिंचन विभागातून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त झाले होते.
देवराव उचके ()
देवराव तुकाराम उचके (८३, रा. किल्ला रोड, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मनपाचे अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांचे वडील होत.
सुधाकर बोरकर ()
सुधाकर बोरकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
पीयूष देसाई ()
पीयूष देसाई (४८ रा. क्वेटा कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भय्याजी निंबाळकर ()
भय्याजी नत्थुजी निंबाळकर (७२, रा. झिंगाबाई टाकळी, फरस चौक) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चुडामन चिचखेडे ()
चुडामन मणिराम चिचखेडे (८१ रा. राजगृहनगर, नारी रोड) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रामचंद्र बागडे ()
रामचंद्र गंभीरजी बागडे (६८ रा. राजगृहनगर, नारी रोड) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंगला पिंजरकर ()
मंगला मनोहर पिंजरकर (७९, रा. रविनगर, एनएसके सोसायटी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसंतराव रोडे ()
वसंतराव किसनराव रोडे (८३) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून उपकुलसचिव म्हणून निवृत्त झाले होते.
विलास जुननकर ()
विलास नत्थुजी जुननकर (७८, रा. श्रीनगर परसोडी) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
निर्मलाबाई भोंदले ()
निर्मलाबाई पांडुरंगजी भोंदले ( रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यतसंस्कार झाले.
छायाताई खंगार ()
छायाताई विजयराव खंगार (६०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नत्थुजी चव्हाण ()
नत्थुजी डोमाजी चव्हाण (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
प्रभाकर घरोटे ()
प्रभाकर पुंडलिक घरोटे (७४) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सीमा कडवे ()
सीमा सुरेश कडवे (६४, रा. श्रीरामनगर, न्यू सुभेदार लेआऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मोहन कोठेकर ()
मोहन मनोहर कोठेकर (६७) यांचे निधन झाले. ते रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक अरविंद कोठेकर यांचे ज्येष्ठ बंधू होत.
कुणाल बावनकर ()
कुणाल प्रभाकर बावनकर (३५ रा. तेलीपुरा, इतवारी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बारणबाई कावळे ()
बारणबाई रामचंद्र कावळे यांचे निधन झाले. दहेगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
रामभाऊ बागडे ()
रामभाऊ तुकाराम बागडे (६९ रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
श्रीकृष्ण सावदेकर ()
श्रीकृष्ण दिगंबर सावदेकर (८४, रा. मोदी नंबर १, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
योगेश बनकर (एच : डेली : योगेश बनकर )
योगेश हरिदास बनकर (४९, रा. गोरले लेआऊट, सुभाषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.