निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:07 IST2021-04-14T04:07:52+5:302021-04-14T04:07:52+5:30

अशोक कावळे () अशोक चिंधुसाव कावळे (७६, जुना सुभेदार, शारदा चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार पार पडला. ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

अशोक कावळे ()

अशोक चिंधुसाव कावळे (७६, जुना सुभेदार, शारदा चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार पार पडला. त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवर आहे.

आसुदोमल गुरबानी ()

आसुदोमल सोमोमल गुरबानी (प्लॉट नं. ८८-८९, हिरानगर, जरिपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबन बावनगडे ()

बबन प्रभाकर बावनगडे (नागपूर) यांचे निधन झाले. मंगळवारी सकाळी नारी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजन चावरिया ()

राजन चावरिया (६३, इमाममवाडा) यांचे निधन झाले. ते नागपूर मनपाचे इमामवाडा वाॅर्डाचे माजी नगरसेवक होते. सकाळी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

रुक्मणी फुलवानी ()

रुक्मणी मोहनदास फुलवानी (६३, छापरू नगर सोसायटी, नंबर-१) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

सुनील कुडे ()

सुनील नामदेव कुडे (५८, लोखंडे नगर, आयटी पार्क रोड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

पवन खराबे ()

पवन नरहरी खराबे (४२, रा. खरबी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन बहिणी, जावई असा परिवार आहे.

सुनील पाध्ये ()

सुनील पाध्ये (६०, धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. कार्तिक मेडिकल स्टोअर्सचे ते संचालक होते.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.