शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:03 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केला असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी कामगार विमा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.

ठळक मुद्देमृताच्या पत्नीचा आरोप : कामगार विमा रुग्णालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केला असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी कामगार विमा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.दीपक गणपतराव ब्राह्मणकर (३८) रा. यवतमाळ, हल्ली मु. बुटीबोरी असे कामगार रुग्णाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष केअरवेल सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायजर पदावर दीपक ब्राह्मणकर कामाला होते. त्यांना काही दिवसांपासून पोटाचा त्रास होता. २७ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांनी सोमवारीपेठ येथील कामगार विमा रुग्णालयात तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी हर्निया शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी १५ जानेवारी २०१८ ची तारीख दिली. सकाळी ९.३० वाजता ते रुग्णालयात आले. डॉक्टरांनी भरती करून घेतले. त्यांच्या सोबत पत्नी आशा ब्राह्मणकर होती. ब्राम्हणकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, पतीला भरती होऊन २४ तास झाले तरी उपचाराला सुरुवात झाली नव्हती. साधी सलाईनही लावली नव्हती. भरती झाले तेव्हा पती चांगलेच होते. नाश्ता, जेवण देऊ नका असे डॉक्टरांनी सांगून सकाळी त्यांना शस्त्रक्रियेसाठी तयार केले. दीपक यांच्यासह इतर चार रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले होते. दीपक यांचा पहिला क्रमांक होता. शस्त्रक्रियेसाठी नेण्यापूर्वी कुठलीही तपासणी करण्यात आली नव्हती. त्यांचे केसपेपरसुद्धा तयार केले नव्हते. त्यामुळे डॉक्टर व स्टाफला रुग्णाचे नाव काय आहे, याचीसुद्धा माहिती नव्हती. शस्त्रक्रियागृहात नेले तेव्हा उपस्थित डॉक्टरांनी बधिरीकरणाचा डोज दिला. परंतु हा डोज जास्त झाला की काय १५-२० मिनिटांमध्ये डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. डॉक्टर काही सांगायला तयार नव्हते. डॉक्टरांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली. परिचारिका, मला व ‘आरएमओ’ला रुग्णवाहिकेत बसवून १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास धंतोली येथील केअर हॉस्पिटलमध्ये पाठविले. या दरम्यान, पतीची हृदयगती बंद होती. आॅक्सिजन मास्क नाकाऐवजी तोंडात टाकले होते. रक्तसुद्धा निघत होते. केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तपासून एक-दीड तास उपचार केले. परंतु नंतर मृत घोषित केले. पतीचा मृत्यू विमा रुग्णालयातच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला. बेजबाबदार डॉक्टर व स्टाफची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टर