नागपूर, यवतमाळमध्ये मृत्यू तांडव सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:07 IST2021-04-14T04:07:30+5:302021-04-14T04:07:30+5:30
नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर सुरू असून दररोज होणारे मृत्यू थांबताना दिसत नाहीत. मंगळवारी नागपुरात तब्बल ६५ जणांचा मृत्यू ...

नागपूर, यवतमाळमध्ये मृत्यू तांडव सुरूच
नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर सुरू असून दररोज होणारे मृत्यू थांबताना दिसत नाहीत. मंगळवारी नागपुरात तब्बल ६५ जणांचा मृत्यू झाला. तर त्यापाठोपाठ यवतमाळमध्येही २३ जणांना जीव गमवावा लागला. वाढत्या मृत्यूसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये ‘कोरोना’ची भीषणता कायमच असून मंगळवारी ६ हजार ८२६ नवे बाधित आढळले, तर २४ तासात ६५ मृत्यूची नोंद झाली. चाचण्यांची संख्या २९ हजाराहून अधिक गेली आहे. दोन दिवसात मृत्यू सहा हजाराचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत. शासकीय इस्पितळांमध्ये रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले असून नागपूरचे रुग्ण अमरावती येथे पाठविण्याची वेळ आली आहे.
भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही मंगळवारी एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. अमरावती व वर्धा वगळता इतर जिल्ह्यात मृत्यूचा आकडा दोन अंकी आहे.
अशी आहे मंगळवारची स्थिती
जिल्हा बाधित मृत्यू
नागपूर ६,८२६ ६५
गडिचरोली ३७० २०
चंद्रपूर १०१० १४
भंडारा ११३५ १२
गोंदिया ७४२ १२
वर्धा ४८१ ००
अमरावती ५२२ ०८
यवतमाळ ९५३ २३
बुलडाणा
अकोला
वाशिम