ऑटोच्या धडकेने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 3, 2014 02:56 IST2014-06-03T02:56:17+5:302014-06-03T02:56:17+5:30
भरधाव ऑटोची धडक बसल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाला. सीताबर्डीतील झांशी राणी

ऑटोच्या धडकेने एकाचा मृत्यू
मृत व्यक्ती अनोळखी : आरोपी गजाआड नागपूर : भरधाव ऑटोची धडक बसल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाला. सीताबर्डीतील झांशी राणी चौकाजवळ (मातृसेवा संघासमोर) हा भीषण अपघात घडला. मृताची ओळख पटू शकली नाही. आरोपीचे नाव सचिन सुभाषराव लांडे (वय २३) आहे. तो वानाडोंगरीतील साईनगरात अरविंद सरोदेच्या घरी राहतो. आरोपी सचिनने निष्काळजीपणे सहाआसनी ऑटो (एमएच ३१/ सीबी ३९२३) चालवून अंदाजे ४५ ते ५0 वर्षाच्या एका इसमाला जोरदार धडक मारली. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला आजूबाजूच्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी सचिन लांडेला अटक केली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, सीताबर्डीच्या गजबजलेल्या परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत ऑटोचालक आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारांचा हैदोस सुरू असतो. ऑटो मध्येच उभे करून रस्त्यावरून जाणार्यांना अडविणे, विनाकारण घिरट्या घालणे, कट मारणे, असे प्रकार सुरू असल्यामुळे या भागात रोजच छोटेमोठे अपघात घडत असतात. रस्त्यावरील वाहतुकीसही नेहमीच अडथळा निर्माण केला जातो. पोलिसांनी कडक कारवाई केल्यास ऑटोचालक संघटितपणे पोलिसांच्या नावाने शिमगा करतात. पोलीसही या ऑटोचालकावर कारवाई करण्यास कचरतात. (प्रतिनिधी)