शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

तेलंगाणा एक्स्प्रेसमध्ये वृद्ध प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:05 AM

नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या कोचमध्ये इतर कुणीच प्रवासी नव्हते. रेल्वे डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या कोचमध्ये इतर कुणीच प्रवासी नव्हते. रेल्वे डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.पाच वर्षापूर्वी भिलाई येथून इतवारी रेल्वेस्थानकावर आलेल्या मालगाडीच्या डब्यात एक मृतदेह आढळला होता. या डब्याला मोतीबागमध्ये आणल्यानंतर त्यातून दुर्गंधी आल्यामुळे या घटनेचा खुलासा झाला होता. आज झालेल्या घटनेत नागपुरात आलेला वृद्ध प्रवासी कोणत्या रेल्वेस्थानकावरून बसला होता, त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की कुणी कोचमध्ये मृतदेह आणून ठेवला आदी प्रश्न उपस्थित करण्यता येत आहेत. या घटनेत दिल्ली-हैदराबाद तेलंगाणा एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी १० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. या गाडीच्या एस ९ कोचमध्ये कुणीच प्रवासी नव्हते. केवळ बेशुद्ध अवस्थेत असलेला प्रवासी कोचमध्ये असल्याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना आणि रेल्वेच्या डॉक्टरांना दिली. रेल्वेच्या डॉक्टरांनी वृद्ध प्रवाशास तपासून मृत घोषित केले. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. मृताच्या अंगात लाल रंगाचे स्वेटर, कत्थ्या रंगाची फुलपँट आहे. वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष असून मृतदेहाची ओळख पटली नाही. तपास हेड कॉन्स्टेबल बाबर शेख करीत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यू