नागपुरात मोकाट कुत्रा चावल्याने वृद्धाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 20:52 IST2018-10-23T20:51:44+5:302018-10-23T20:52:53+5:30
मोकाट कुत्रा चावल्याने एका वृद्धाचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपुरात मोकाट कुत्रा चावल्याने वृद्धाचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोकाट कुत्रा चावल्याने एका वृद्धाचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पांडुरंगजी राजाराम बनसोड (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. बनसोड एमआयडीसीच्या आयसी चौकाजवळ राहत होते. १२ आॅक्टोबरला त्यांना मोकाट कुत्र्याने कडाडून चावा घेतला. वेळीच योग्य उपचार न झाल्याने त्यांना संसर्ग झाला. प्रकृती ढासळल्याने त्यांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.