शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले 

By सुनील चरपे | Updated: July 22, 2023 18:52 IST

पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी जात असलेल्या भाऊ-बहिणीच्या ॲक्टिव्हाची धडक आडव्या आलेल्या गायीला लागली आणि दोघेही रोडवर कोसळले.

टाकळघाट (नागपूर) : पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी जात असलेल्या भाऊ-बहिणीच्या ॲक्टिव्हाची धडक आडव्या आलेल्या गायीला लागली आणि दोघेही रोडवर कोसळले. भावाने जखमी अवस्थेत स्वत:ला सावरले. मात्र, बहीण मागून वेगात आलेल्या ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तिचा भावाच्या डोळ्यादेखत घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी एमआयडीसी (ता. हिंगणा) परिसरात शनिवारी (दि. २२) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

तनिशा निळकंठ कावळे (१७) असे मृत बहिणीचे तर गौरव निळकंठ कावळे (२१) दोघेही रा. टाकळघाट, ता. हिंगणा असे जखमी भावाचे नाव आहे. तनिशा ही हुडकेश्वर नागपूर येथील सेंट पॉल स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकायची तर गौरव बाहेरगावी ॲग्रीकल्चरचे शिक्षण घेतो. सुत्यांचे आईवडील मुलांच्या शिक्षणासाठी काही दिवसांपासून ड्रीम कॉलनी, बुटीबोरी, ता. नागपूर (ग्रामीण) येथे राहतात. टी असल्याने गौरव गावी आला होता.

तनिशाला पुस्तके हवी असल्याने ते खरेदी करण्यासाठी दाेघेही एमएच-४०/सीके-१६७६ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने एमआयडीसी परिसरातून दुकानाकडे जात होते. त्यांच्या ॲक्टिव्हासमोर ट्रक होता. दुभाजक पार करताच मध्ये गाय आडवी गेली. त्यामुळे गौरवचा ताबा सुटला आणि ॲक्टिव्हाची गायीला धडक लागल्याने दोघेही रोडवर कोसळले. गौरवने जखमी अवस्थेत स्वत:ला सावरले. मात्र, तनिशा मागून वेगात आलेल्या टीएस-०६/यूबी-२१५४ क्रमांकाच्या सिमेंट कॉंक्रीट मिक्सर मशीनच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी मिक्सर मशीन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मोकाट गुरे अपघातांना कारणीभूतएमआयडीसी परिसरात २४ तास वाहनांची वर्दळ असते. त्यातच या भागातील तसेच बुटीबोरी येथील मुख्य व अतंर्गत रोडवर मोकाट गुरांचा सतत ठिय्या असतो. धीट झालेली ही गुरे हालकून अथवा हॉर्नच्या आवाजामुळे बाजूला होत नाही. ती भरधाव वाहनांना अचानक आडवी जात असल्याने अपघात होतात. ही बाब सर्वांना माहिती असून, कुणीही त्या गुरांचा कायम बंदोबस्त करणे व त्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करण्याचे साधे धाडसही करीत नाही. 

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातDeathमृत्यू