नागपूर जिल्ह्यात बिबट्याचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:07 IST2018-10-12T00:05:20+5:302018-10-12T00:07:16+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पिपरिया गावाजवळ सिल्लारी-पवनी रोडवर बिबट्याच्या एका छाव्याचा अपघातात मृत्यू झाला.

नागपूर जिल्ह्यात बिबट्याचा अपघातात मृत्यू
ठळक मुद्देसिल्लारी-पवनी रोडवर बिबट्याचा मृत छावा आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पिपरिया गावाजवळ सिल्लारी-पवनी रोडवर बिबट्याच्या एका छाव्याचा अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सूचना मिळताच वन विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. व्हेटरनरी डॉक्टरांच्या तपासणीनंतर नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.