शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

गडरच्या खड्डयात दबून मजुराचा मृत्यू, अधिकारी-कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 3:20 PM

गडर लाईनचे काम मजुरांकडून करवून घेताना महापालिका प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे एका मजुराचा मृत्यू झाला.

नागपूर - गडर लाईनचे काम मजुरांकडून करवून घेताना महापालिका प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे एका मजुराचा मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमकारनगरात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली. 

ओमकारनगर चौकाजवळच्या हरिओम कॉलनीत पाईपलाईनचे आणि गडर लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता तेथे अरविंद ईनवाती (वय २५) आणि चेतन ईनवाती (वय ५०, रा. मुल सारंगपूर लखनादौन, जि. शिवनी) हे काम करीत होते. काम करता-करता अचानक मातीचा ढिगारा खचल्याने ते दोघेही खड्डयात पडले आणि वरून त्यांच्या अंगावर माती पडल्याने ते दबले. आजुबाजुच्यांपैकी एकाला मजूर खड्डयात पडताना दिसल्याने त्याने आरडाओरड करून नागरिकांना जमविले. ओलसर मातीखाली ते दबल्याने त्यांना काढणे जमणार नाही, हे लक्षात आल्यामुळे एकाने अग्निशमन दल आणि दुस-याने अजनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तेथे पोलीस आणि अग्निशमन दलाचा ताफा पोहचला. तोपर्यंत तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दीड तास परिश्रम घेतल्यानंतर दोघांनाही बाहेर काढले. मात्र, अरविंदचा मृत्यू झाला होता. गंभीर अवस्थेतील चेतन ईनवातीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहे.  संतपाल संतोष इनवाती (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

कंत्राटदाराला अटक अधिका-यांची पाठराखण ? धोक्याच्या ठिकाणी गरिब मजुरांना कामावर जुंपताना ब-याच ठिकाणांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केली जात नाही. या ठिकाणी देखिल असाच प्रकार घडला. त्यामुळे जमावाने महापालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराच्या नावे मोठी ओरड केली होती. या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही लावून धरली होती. पोलिसांनी ही बाब लक्षात घेता हलगर्जीपणाच्या आरोपाखाली कंत्राटदार आरोपी संजय किसन पिसे (वय ४४, रा.  निर्मलनगर) आणि या कामाच्या ठिकाणी सपुरविजन कररणारा परमेश्वर मधुकर हटवार (वय ४६, रा. गणेशनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटकही करण्यात आली. महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिका-यांची मात्र पोलिसांनी पाठराखन केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा तसेच मृत व जखमीच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत द्या, अशी मागणी होत आहे.