जखमी हॉटेल व्यावसायिकाचा अखेर मृत्यू : जरीपटक्यात हत्येचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:50 IST2019-06-26T00:49:53+5:302019-06-26T00:50:36+5:30
शुक्रवारी पहाटे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हॉटेल व्यावसायिक महेश वरयानी यांचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

जखमी हॉटेल व्यावसायिकाचा अखेर मृत्यू : जरीपटक्यात हत्येचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी पहाटे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हॉटेल व्यावसायिक महेश वरयानी यांचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला.
वरयानी हे त्यांचे हॉटेल बंद करून पत्नीसह घरी परत जात होते. त्यांच्या घराजवळ पॉवरग्रीड चौकात आरोपी आकाश छाबडा आणि त्याचा भाऊ दीपक या दोघांनी महेशचा पाठलाग केला. जवळ येऊन महेशची पत्नी भाविशा हिला लज्जास्पद भाषेत बोलले. त्यामुळे महेशने स्कुटर थांबवून आरोपींना जाब विचारला असता आरोपी छाबडा बंधूंनी महेश वरयानीवर प्राणघातक हल्ला चढवला. एकाने त्यांच्या डोक्यावर बियरची बॉटल फोडली तर दुस-याने चाकू काढून भोसकले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, पत्नी भाविशाच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. जखमी वरयानी यांनी चार दिवस मृत्यूशी झूंज दिल्यानंतर सोमवारी रात्री प्राण सोडले. त्यामुळे जरीपटका पोलिसांनी आता या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.