विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST2021-06-16T04:12:06+5:302021-06-16T04:12:06+5:30

नरखेड : दुरुस्तीचे काम करीत असताना विद्युत कर्मचाऱ्यास जाेरात विजेेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना ...

Death of an employee due to electric shock | विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

नरखेड : दुरुस्तीचे काम करीत असताना विद्युत कर्मचाऱ्यास जाेरात विजेेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बानाेर (पिठाेरी) शिवारात साेमवारी (दि. १४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

जितेंद्र निळकंठ धवराळ (२८, रा. वडेगाव-उमरी, ता. नरखेड) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते महावितरण कंपनीमध्ये वीज तंत्रज्ञपदी नाेकरी करायचे. दरम्यान, साेमवारी सकाळी बानाेर (पिठाेरी) शिवारात विद्युत लाईनचे काम करीत हाेते. त्यातच त्यांना जाेरात विजेचा धक्का लागला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी नाेंद केली असून, पुढील तपास बीट जमादार प्रकाश खाेपे करीत आहेत.

Web Title: Death of an employee due to electric shock