जिवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:07 AM2021-04-11T04:07:14+5:302021-04-11T04:07:14+5:30

नागपूर : रुग्ण महिला जिवंत असताना नातेवाइकांच्या हाती ‘डेथ सर्टिफिकेट’ देऊन दुसऱ्याचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ८ ...

'Death Certificate' issued to a living patient | जिवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’

जिवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’

Next

नागपूर : रुग्ण महिला जिवंत असताना नातेवाइकांच्या हाती ‘डेथ सर्टिफिकेट’ देऊन दुसऱ्याचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास डोंगरगाव येथील ‘गायकवाड पाटील कोविडालय’ या कोविड केअर सेंटरमध्ये घडला. या प्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले आहेत.

रुग्णाचे नातेवाईक मनोज लिहितकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, काशीनगर येथील रहिवासी आशा मून (६३) या त्यांच्या मावशी शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्या. कुटुंबात हा आजार पसरू नये म्हणून त्यांना डोंगरगाव येथील पूर्वीचे गायकवाड पाटील कॉलेज, तर आताचे कोविडालयात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भरती केले. भरती केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना घरी पाठविले. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कोविडालयातून फोन आला. आशा मून यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती दिली. सर्व नातेवाईक कोविडायलयात पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र त्यांना सोपविले तसेच प्लास्टिकच्या बॅगमध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. नातेवाइकांनी मृताचा चेहरा दाखविण्याची अट घातली.

बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाईकांनी मून यांना जिथे ठेवले होते, तिथे धाव घेतली. त्या पलंगावर बसून होत्या. नातेवाइकांनी याच जाब विचारल्यावर तेथील बाऊन्सरने सर्व नातेवाइकांना बाहेर काढले. आशा मून यांना डिस्चार्ज दिला. आता त्या घरी होम आयसोलेशनमध्ये आहेत. या प्रकरणाची तक्रार हिंगणा पोलीस ठाण्यात करणार असल्याचेही लिहितकर यांनी सांगितले.

Web Title: 'Death Certificate' issued to a living patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.