भंडारा : खैरलांजी हत्याकांडातील प्रमुख आरोपींपैकी एक विश्वनाथ धांडे या (७०) वृद्धाचा बुधवारी नागपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. धांडे यांचा मृतदेह गुरुवारी खैरलांजी येथे आणण्यात आला. धांडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आंधळगाव पोलीस सूत्रांनी दिली. खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ रोजी घडले होते. यात भोतमांगे कुटुंबीयातील चार सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 06:05 IST