जीवघेण्या नायलॉन मांजाच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:41+5:302021-01-13T04:17:41+5:30
- व्यापारी प्रशासनाच्या रडारवर : उत्पादकांवर कायदेशीर कारवाई व्हावी मेहा शर्मा नागपूर : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नायलॉन आणि ...

जीवघेण्या नायलॉन मांजाच्या
- व्यापारी प्रशासनाच्या रडारवर : उत्पादकांवर कायदेशीर कारवाई व्हावी
मेहा शर्मा
नागपूर : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नायलॉन आणि सिंथेटिक मांजावर प्रतिबंध लावल्यानंतरही दुकानदार अवैधरीत्या विक्री करीत आहेत. प्रतिबंधित चिनी मांजा (९०० मीटर) ५०० पासून अडीच हजार रुपयांपर्यंत विकल्या जात आहे. हा गोरखधंदा बंद दरवाजातून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होत आहे. जीवघेण्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे. या अवैध विक्रीमुळे व्यापारी प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.
या मांजामुळे जीवघेणे अपघात आणि पक्ष्यांचे मृत्यू होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते नायलॉन आणि सिंथेटिक मांजा आणि प्लास्टिकच्या पतंग विक्रीचा विरोध करीत आहेत. प्रशासनाने डिसेंबरपासून अशा विक्रेत्यांवर छापा टाकून कारवाई सुरू केली आहे. त्यानंतरही मांजा विक्रेते कायद्याचे सर्रास उल्लंघन करून विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
मनपाचा न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडने (एनडीएस) याबाबत विविध भागात कारवाई करून २७ डिसेंबरपर्यंत या टीमने नायलॉन मांजाचे ११ रिल आणि १२६८ प्लास्टिक पतंग जप्त केल्या. एनडीएसचे कमांडंट वीरसेन सिंह तांबे म्हणाले, आम्ही विक्रेत्यांवर दबाब टाकत आहो. त्यानंतरही छुप्या मार्गाने मांजा आणि पतंगांची विक्री होतच आहे. आम्हाला पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. अंडरकव्हर ऑपरेशनदरम्यान प्राप्त माहितीच्या आधारावर आम्ही विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी जातो तेव्हा ते वेगळ्या पद्धतीने व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून व्यवसाय करू लागतात.
अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी म्हणाले, मनपाच्या काही मर्यादा असून उत्पादक आणि डीलरविरुद्ध क्रिमिनल कारवाई करता येत नाही. आम्हाला केवळ मांजा व पतंग जप्त करता येते अथवा दंड आकारता येतो. पतंग फेस्टिव्हल आयोजनासंदर्भात ते म्हणाले, कायदा तयार करणे आमच्या हातात नाही. यासंदर्भात धोरण आले तर आम्ही महाराष्ट्रातही गुजरात मॉडेलचा अवलंब करू शकतो. हा एक सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.
कायदेशीर कारवाई आवश्यक
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक आणि पर्यावरणतज्ज्ञ कौस्तुभ चैटर्जी म्हणाले, नायलॉन मांजा बाजारात येण्यापूर्वीच उत्पादकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी लागेल. एकदा मांजा बाजारात पोहोचल्यास विक्रेत्यांचा शोध घेणे कठीण होते.
कठोर कारवाई करण्यात येणार
कायदा तोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, नायलॉन मांजा उत्पादक पोलिसांच्या टप्प्यात येत नसून, केवळ विक्रेता आणि डीलर येतात. यांच्यावर आम्ही कारवाई करून लोकांचा जीव वाचवू शकतो. कायदा तोडणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे.