बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेहच आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:32 IST2017-10-31T00:32:17+5:302017-10-31T00:32:30+5:30

बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा १९ तासानंतर मृतदेहच आढळला. चिमुकल्याचा मृतदेह चांपा (बोरडा) गावाला लागून असलेल्या कालव्यालगतच्या झुडपात आढळला. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

The dead body of the missing son was found | बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेहच आढळला

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेहच आढळला

ठळक मुद्देरविवार सायंकाळपासून होता बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा १९ तासानंतर मृतदेहच आढळला. चिमुकल्याचा मृतदेह चांपा (बोरडा) गावाला लागून असलेल्या कालव्यालगतच्या झुडपात आढळला. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
साईभरत व्यंकटेश कुचीपुडी (४, रा. चांपा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. साईभरत हा रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या घरासमोर खेळत होता. सायंकाळ होऊनही तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत कन्हान पोलिसांनाही सूचना देण्यात आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्याची आसपासच्या गावात शोधाशोध केली. मात्र तो कुठेच आढळून आला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा त्याचा शोध घेणे सुरू असतानाच सकाळी ११ वाजताच्या सुमारास कालव्यालगतच्या एका झुडपात साईभरत हा मृतावस्थेत आढळून आला. कन्हान पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याबाबत श्रीनिवास सुब्बाराव वाकलकुट्टी यांच्या सूचनेवरून कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: The dead body of the missing son was found