दाऊदी बोहरा जमातने साधेपणाने साजरी केली ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:46+5:302021-05-13T04:08:46+5:30
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे दाऊदी बोहरा जमातच्यावतीने बुधवारी ईद-उल-फितर साधेपणाने साजरी करण्यात आली़ जमात सदस्यांनी नमाज व खुतबाचे ...

दाऊदी बोहरा जमातने साधेपणाने साजरी केली ईद
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे दाऊदी बोहरा जमातच्यावतीने बुधवारी ईद-उल-फितर साधेपणाने साजरी करण्यात आली़ जमात सदस्यांनी नमाज व खुतबाचे घरीच वाचन केले. तसेच, जमात बांधवांना ऑनलाईन पध्दतीने शुभेच्छा दिल्या़
ईद-उल-फितर गेल्या वर्षीही साधेपणाने साजरी करण्यात आली होती़ जमात प्रमुखांनी यावर्षीही साधेपणा जपण्याचे आवाहन केले होते़ त्यामुळे इतवारी, शांतिनगर, सदर इत्यादी भागातील बोहरा जमात मशिदी बंद ठेवण्यात आल्या़ दाऊदी बोहरा जमात इतवारीचे सचिव शेख नजमुद्दीनभाई फिदवी यांनी ईद-उल-फितर साधेपणाने साजरी करण्यात आल्याचे सांगितले़ याप्रसंगी धर्मगुरू सैयदना साहेब यांनी जमात सदस्यांना देशाप्रतिची जबाबदारी पूर्ण करण्याचे आणि समाजाची मदत करण्याचे आवाहन केले़ तसेच, त्यांनी कोरोना नष्ट व्हावा अशी प्रार्थना केली़ जमातने रमजानच्या दहाव्या रोजापासून कोरोना रुग्णालय सुरू केले आहे़ त्या रुग्णालयात लाभाची अपेक्षा न ठेवता उपचार केले जात आहेत़ तसेच, जमात सदस्यांनी गरजू नागरिकांना महिनाभर भोजन वितरित केले़ या कार्याला फैजुल मावैदिल बुरहानिया, शबाबुल ईदिज जहाबी, तोलाबाउल कुलियात, दाना कमेटी, बुरहानी मेडिकल आदींनी सहकार्य केले़