शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या चोरली बुलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 9:18 PM

चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्याही चोरी करू लागले आहेत. वाहन चोरांनी गुरुवारी खरे टाऊन धरमपेठ येथील एका अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या बुलेट (बाईक) चोरून नेली. घटनेला ३० तास उलटल्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते शहराबाहेर असल्याने गुन्हा दाखल केलेला नाही.

ठळक मुद्देनागपूरच्या खरे टाऊनमधील घटना : आरोपींचा पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्याही चोरी करू लागले आहेत. वाहन चोरांनी गुरुवारी खरे टाऊन धरमपेठ येथील एका अपार्टमेंटमधून दिवसाढवळ्या बुलेट (बाईक) चोरून नेली. घटनेला ३० तास उलटल्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते शहराबाहेर असल्याने गुन्हा दाखल केलेला नाही.खरे टाऊन येथील अनिरुद्ध अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर ट्रॅव्हल्स एजन्सीचे संचालक अनिकेत डवले राहतात. डवले यांनी त्यांची एम.एच.३१/ईडब्ल्यू/०२०२ क्रमांकाची बुलेट अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली होती. गुरुवारी दुपारी २ वाजता एका बाईकवर तीन युवक अपार्टमेंटजवळ आले आणि परिसराची पाहणी करून परत गेले. १५ मिनिटानंतर पार्किंगमध्ये ठेवलेली अनिकेत यांची बुलेट चोरण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान बेसमेंटमध्ये राहणाºया एका महिलेची नजर आरोपींवर गेली. महिलेला जवळ येताना पाहून आरोपी मोबाईलवर बोलण्याचे नाटक करू लागले. ते अशाप्रकारे बोलत होते की, कुणाच्या तरी सांगण्यावरून ते बुलेट घ्यायला आले आहेत. त्यामुळे महिलाही आपले काम करू लागली. एक आरोपी केवळ पाच मिनिटात दीड लाख रुपये किमतीची बुलेट चोरून अपार्टमेंटच्या बाहेर आला. तो बुलेटवर स्वार झाला. त्यांच्यापैकी तिसरा साथीदार अगोदरच बाहेर उभा होता. तो बुलेटला धक्का देऊ लागला. दोघेही बुलेट घेऊन फरार झाले.रात्री ८ वाजताच्या सुमारास अनिकेत आणि त्यांची पत्नी खरेदी करण्यासाठी खाली उतरले. त्यांना बुलेट जागेवर दिसली नाही. त्यांनी विचारपूस केली असता महिलेने घडलेला प्रकार सांगितला. अनिकेत यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर सीताबर्डी पोलिसांना सूचना देण्यात आली.ज्या ठिकाणी ही घटना घडली तो रहिवासी परिसर आहे. तिथे नेहमीच नागरिकांची ये-जा असते. जवळच दोन गर्ल्स होस्टेल आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशांचे निवासस्थानही आहे. खरे टाऊन परिसरात नेहमीच व्हीआयपी मंडळींची ये-जा असते. पोलिसांचीही नेहमी गस्त असते. यानंतरही आरोपींनी मोठ्या हिमतीने दिवसाढवळ्या बुलेट चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीचा शोध घेतला जात आहे.सराईत गुन्हेगार असल्याचा संशयआरोपींनी ज्या पद्धतीने दिवसाढवळ्या वाहन चोरून नेले. त्यावरून ते सराईत वाहन चोर असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षदर्शी महिलेने त्यांना पार्किंगमध्ये पाहिले. तेव्हा तिने याबाबत अनिकेतला सांगण्याचे ठरवले. आरोपींच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी लगेच मोबाईलवर अशा पद्धतीने बोलण्याचे नाटक केले की, अनिकेत यांनीच जाणून त्यांना बुलेट घेऊन जाण्यास संगितले असावे.

 

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर