शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

नागपुरात पुन्हा डेंग्यूची भीती : ७३१६ घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 9:47 PM

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. असे असताना, शहरातील ७३१६ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या दूषित घरांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने प्रस्ताव तयार केला आहे, परंतु वर्ष होऊनही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.

ठळक मुद्देनागरिकांना कधी धरणार जबाबदार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. असे असताना, शहरातील ७३१६ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या दूषित घरांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने प्रस्ताव तयार केला आहे, परंतु वर्ष होऊनही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डेंग्यू हा विषाणूजन्य (व्हायरल इन्फेक्शन) आजार आहे. ‘एडिस एजिप्टी’ डासाच्या चावण्याने हा आजार होतो. डेंग्यूचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. दुसऱ्यांदा डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त गंभीर होतो. मात्र, जुन्या चुकांमधून धडा घ्यायला कुणी तयार नाही. डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असताना केवळ आरोग्य विभागावर जबाबदारी टाकली जाते. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात असल्याचे वास्तव आहे. महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडून घराघरांची तपासणी सुरू असली तरी याचा विशेष फायदा होताना दिसून येत नाही. तपासणीनंतरही त्याच-त्याच घरात डासांच्या अळ्या आढळून येत असल्याचे वास्तव आहे. ज्या घरात डासांच्या अळ्या आढळून येतात अशा घरमालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. विशेषत: जोपर्यंत आर्थिक दंडाची कारवाई होत नाही, तोपर्यंत ही तपासणी प्रभावशाली राहणार नाही, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.५ लाख ४६ हजार घरांची तपासणीउपराजधानीत गेल्या चार वर्षांपासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. २०१४ मध्ये या रोगामुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. या वर्षी आतापर्यंत २० रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यू डासाच्या अळीचा शोध घेऊन त्याचा नायनाट करण्यासाठी मनपाचा हिवताप व हत्तीरोग विभाग दरवर्षी घरांची तपासणी मोहीम हाती घेतो. यावर्षी जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत ५ लाख ४६ हजार ४३१ घरांची तपासणी केली असून ७ हजार ३१६ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.डेंग्यूचा डास हा पाच ‘एमएल’ साचलेल्या पाण्यातही अंडी घालतो. यामुळे डेंग्यूची पैदास झपाट्याने वाढते. परिणामी, डेंग्यू डासांच्या उत्पत्तीचे केंद्र हे कुलर्स ठरत आहेत. हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला दूषित घरांमधील ८९९ कुलर्समध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. याशिवाय, टिन कंटेनर, कुंड्या, नांद, सिमेंटचे टाके, प्लास्टिक व मातीची भांडी, टायर, फुलदाणीमध्येही अळ्या मिळाल्या.कारवाईचा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडेहिवताप व हत्तीरोग विभागाने घरांमध्ये आढळून येणाºया डेंग्यू डासांच्या अळ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी कारवाईचे अधिकार देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे सादर केला. येथून हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे गेला. परंतु वर्ष होऊनही अद्याप मंजुरी मिळाली नाही. यात डेंग्यूच्या अळ्या आढळून येणाºया बांधकाम मालकावर व रुग्णालय संचालकावर पहिल्या तपासणीत ५०० रुपये तर घरमालकावर १०० रुपये आर्थिक दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे.नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेणे आवश्यकगेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांची संख्या कमी झाली आहे. नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन उपाययोजना केल्यास ही संख्या आणखी आटोक्यात आणता येऊ शकते. मनपाच्यावतीने घराघरांची तपासणी सुरू आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळून येणारे कुलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, फुलदाणी हे आपल्यासमक्ष खाली करून किंवा त्यात कीटकनाशक फवारणी किंवा गप्पी मासे सोडले जात आहे.डॉ. जयश्री थोटेअधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभाग, मनपा

टॅग्स :dengueडेंग्यूnagpurनागपूर