कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘प्रेम के ढाई अक्षर’

By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:22+5:302016-04-03T03:52:22+5:30

कॅन्सर हा सर्वत्र फोफावणारा एक दुर्धर रोग आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्टीने काळजीत टाकणारा हा आजार आहे.

'Dangers of Love' to help cancer patients | कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘प्रेम के ढाई अक्षर’

कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘प्रेम के ढाई अक्षर’

मैना फाऊंडेशनचे आयोजन : कनक सूर मंदिरचे सादरीकरण
नागपूर : कॅन्सर हा सर्वत्र फोफावणारा एक दुर्धर रोग आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्टीने काळजीत टाकणारा हा आजार आहे. कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत योग्य पद्धतीने झाले नाही तर त्यातून बाहेर पडणे पीडितांसाठी कठिण आव्हान होते. स्तन कॅन्सरने ग्रासलेल्या आणि आर्थिक दृष्टीने दुर्बल महिलांना उपचारासाठी मदत करण्यासाठी २००८ सालापासून कार्यरत असणाऱ्या मैना फाऊंडेशनतर्फे एका संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘प्रेम के ढाई अक्षर’ हा गीतांचा कार्यक्रम कनक सूर मंदिरतर्फे सादर करण्यात आला.
साई सभागृह, शंकरनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे संचालक व ज्येष्ठ गायक डॉ. दत्ता हरकरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात डॉ. दत्ता हरकरे, कनका गडकरी, नीलेश दामले, अनुजा केदार, साक्षात कट्यारमल या गायकांनी तयारीने गीत सादर करून उपस्थितांची दाद घेतली. कार्यक्रमाला डॉ. गिरीश गांधी, माजी महापौर कुंदाताई विजयकर, आ. सुनील केदार, मैना फाऊंडेशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक शंकर बळवंत ऊर्फ राजाभाऊ पंडित, अलका व विनय श्रीखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते राजाभाऊ पंडित लिखित ‘आॅन ह्युमन बिहेवियर’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तक विक्रीतून येणाऱ्या निधीचा उपयोग विदर्भातील स्तन कॅन्सरग्रस्त महिलांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे. याप्रसंगी राजाभाऊ पंडित यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. इंडियन कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या अतिशय महाग उपचारांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. विदर्भात मैना फाऊंडेशन जे कार्य करीत आहे, ते अतिशय महत्त्वाचे असून आपले शक्य तेवढे सहकार्य आपण फाऊंडेशनला करू, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी. खा. दत्ता मेघे प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर मानवी जीवनातील प्रेमाच्या विविध भावना अधोरेखांकित करणारा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘इक शहनशाह बनवाके हसी ताजमहल, चांद सिफारीश है करता हमारी, हमने देखी है इन आँखो की..., बेताब दिल की.., मेरे दिल ने जो मांगा, ये जिंदगी उसी की है.., यारा हो यारा’ आदी अनेक गीतांनी हा कार्यक्रम रंगतदार झाला. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर तर साथसंगत गडीकर, दहासहस्र, टांकसाळे, जोशी, दीपक कांबळे, पसेरकर यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Dangers of Love' to help cancer patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.