नृत्याची धम्माल..वैशालीच्या गीतांची कमाल अन् प्राचीचा संवाद
By Admin | Updated: December 1, 2014 00:52 IST2014-12-01T00:52:52+5:302014-12-01T00:52:52+5:30
‘ऐका दाजीबा’ फेम प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल गीतांनी प्रेक्षकांनी अख्खे स्टेडियम डोक्यावर घेतले. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई हिची उपस्थिती अन् लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड

नृत्याची धम्माल..वैशालीच्या गीतांची कमाल अन् प्राचीचा संवाद
लोकमत सखी मंचच्या आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी
नागपूर : ‘ऐका दाजीबा’ फेम प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल गीतांनी प्रेक्षकांनी अख्खे स्टेडियम डोक्यावर घेतले. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई हिची उपस्थिती अन् लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराज्यीय धमाल दांडिया’ स्पर्धेची अंतिम फेरी, अशा रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी नागपूरकरांना शनिवारी मिळाली. खच्चून भरलेल्या चिटणीस पार्क मैदानावरील १० हजाराहून अधिक प्रेक्षक तब्बल चार तास वैशाली सामंतच्या गाण्यावर व धमाल दांडियाच्या तालावार थिरकले. स्पर्धेचे परीक्षक असलेले स्टार प्रवाहवरील जयोस्तुते मालिकेचे निर्माता महेश कोठारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, श्वेता शिंदे व जुई गडकरी यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा, मातोश्री वीणादेवी दर्डा व लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते मालार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्र्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, खासदार विजय दर्डा, अभिनेत्री प्राची देसाई, गायिका वैशाली सामंत, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत बोदड, आरती बोदड, निर्माता महेश कोठारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, श्वेता शिंदे व जुई गडकरी, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक प्रकाश जाधव, रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे, युनिक स्लीम पॉर्इंट अॅण्ड ब्युटी क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन आदी उपस्थित होत्या.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत लोकमत नागपूर युनिटचे महाव्यवस्थापक नीलेश सिंह यांनी केले.
कार्यक्रमाला लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, उद्योगपती दिलीप छाजेड, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा, कोषाध्यक्ष अनुजा छाजेड आदी उपस्थित होत्या.
संचालन नेहा जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक रायसोनी ग्रुप आॅफ एज्युकेशन तर पारितोषिक प्रायोजक ‘युनिक स्लीम पॉर्इंट अॅण्ड ब्युटी क्लिनिक’ हे होते. (प्रतिनिधी)