दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त

By Admin | Updated: June 6, 2014 01:01 IST2014-06-06T01:01:23+5:302014-06-06T01:01:23+5:30

आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’

Damaniya 'Raji' - activists anxious | दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त

दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त

दिवसभर संभ्रम : रात्री मात्र दिलासा
नागपूर : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच  कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’मध्ये दम कसा भरायचा, याचीच चिंता कार्यकर्त्यांंंंना दिवसभर  सतावत राहिली. रात्री उशीरा राजीनामा परत घेतल्याचे मॅसेजेस आले आणि दिवसभराच्या तापापासून त्यांना काहीसा दिलासा मिळाला.
दमानिया यांना नागपुरात लोकसभा निवडणुकीत  ६९ हजारावर मते मिळाली. या बळावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी  कार्यकर्त्यांंंंनी चालविली होती. ऐनवेळी राष्ट्रीय चेहरा असलेल्या दमानियांनी साथ सोडल्याचे मॅसेजेस आले आणि कार्यकर्त्यांंंंचे मनोबल खचले.   ‘आप’वर विश्‍वास विश्‍वास दाखविणारे मतदारही नाराज झाले. खासगी चर्चेत  ‘आप या आये किसलिए ? ’ असा सवाल ते दमानियांच्या संदर्भात  करू लागले.
आपण मुंबईच्या रहिवासी असलो तरी नागपूरकरांच्या संपर्कात राहू असे सांगणार्‍या दमानिया यांनी लोकसभेचे मतदान झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी  नागपूर सोडले. सव्वा महिन्यांनी निकालाच्या आदल्या दिवशी त्या नागपुरात आल्या. निकाल पाहिला आणि मुंबईला परतल्या.  ना पराभवाची  कारणमीमांसा केली ना कार्यकर्त्यांंंंंच्या भावना जाणून घेतल्या. आता मध्येच राजीनामा देऊन त्या मोकळ्या झाल्या. एखादा नेता असे कसा काय करू  शकतो, अशीच चर्चा कार्यकर्ते व मतदारांमध्ये होती.
दमानिया यांना नागपुरात ६९ हजारावर मते मिळाली. पश्‍चिम, दक्षिण- पश्‍चिम, दक्षिण व उत्तर नागपूर या चार विधानसभा मतदारसंघात ‘आप’ला दहा  हजारावर मते मिळाली. यापैकी पश्‍चिममध्ये १३ हजार तर दक्षिण-पश्‍चिममध्ये १४ हजारांचा आकडा पार केला. पहिल्याच निवडणुकीत ‘आप’ला  मिळालेली मते पाहता विधानसभा निवडणुकीत निश्‍चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा कार्यकर्त्यांंंंना आहे.  त्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले  आहेत. मात्र, ऐनवेळी कॅप्टननेच माघार घेतल्याच्या बातमीने ‘आप’ची टीम नागपूर हतबल झाली.   आता कुणाच्या हाती नागपूरचे पालकत्व जाईल,  ती व्यक्ती कार्यकर्त्यांंंंंना किती समजून घेईल, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांंंंंच्या मनात घुसमटत राहिले.
मात्र, दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्रीच्या हवेत जसा गारवा जाणवतो तसाच गारवा देणारे मॅसेज रात्री कार्यकर्त्यांंंंंना आले. दमानिया यांनी राजी झाल्या  आहेत. त्यांनी राजीनामा परत घेतला आहे. दिवसभर खचलेले कार्यकर्ते हे मॅसेज वाचून पुन्हा हिमतीने उभे राहिले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Damaniya 'Raji' - activists anxious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.