शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

रेल्वेस्थानकावर दलालास अटक

By admin | Updated: June 5, 2014 01:11 IST

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या एका आरोपीला मंगळवारी सकाळी १0.३0 वाजता पश्‍चिमेकडील आरक्षण कार्यालयात रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

तिकिटे जप्त : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाईनागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या एका आरोपीला मंगळवारी सकाळी १0.३0 वाजता पश्‍चिमेकडील आरक्षण कार्यालयात रेल्वे सुरक्षा  दलाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले.रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणे हा रेल्वे अँक्ट १४३ नुसार गुन्हा आहे, तरीसुद्धा अनेक दलाल रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करतात. मंगळवारी  सकाळी १0.३0 वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडील भागात असलेल्या आरक्षण कार्यालयात आरोपी मुकेश श्रवण तराडे (४१) रा.  मोहननगर, खलाशी लाईन हा तिकिटांच्या रांगेत उभा होता. ड्युटीवर असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा याला त्याच्यावर शंका आली.  त्याने त्यास बाजूला घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ नागपूर-नाशिक प्रवासाचे एक, पुणे-नागपूर प्रवासाचे एक आणि रद्द केलेले एक तिकीट  असे एकूण ६ हजार २२५ रुपये किमतीची रेल्वेची तिकिटे आढळली. याशिवाय त्याच्याजवळ ३५0 रुपये रोख रक्कम होती. लगेच त्यास रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याच्याविरुद्ध रेल्वे अँक्ट  १४३(ब)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची २0 हजार रुपयाच्या  जातमुचलक्यावर सुटका केली. आरोपीला दोन महिने प्रत्येक सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई सहायक  पोलीस निरीक्षक सुशीला अग्रवाल, विकास शर्मा यांनी केली.  (प्रतिनिधी)