रेल्वेस्थानकावर दलालास अटक
By Admin | Updated: June 5, 2014 01:11 IST2014-06-05T01:04:15+5:302014-06-05T01:11:40+5:30
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या एका आरोपीला मंगळवारी सकाळी १0.३0 वाजता पश्चिमेकडील आरक्षण कार्यालयात रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

रेल्वेस्थानकावर दलालास अटक
तिकिटे जप्त : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या एका आरोपीला मंगळवारी सकाळी १0.३0 वाजता पश्चिमेकडील आरक्षण कार्यालयात रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणे हा रेल्वे अँक्ट १४३ नुसार गुन्हा आहे, तरीसुद्धा अनेक दलाल रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करतात. मंगळवारी सकाळी १0.३0 वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या आरक्षण कार्यालयात आरोपी मुकेश श्रवण तराडे (४१) रा. मोहननगर, खलाशी लाईन हा तिकिटांच्या रांगेत उभा होता. ड्युटीवर असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा याला त्याच्यावर शंका आली. त्याने त्यास बाजूला घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ नागपूर-नाशिक प्रवासाचे एक, पुणे-नागपूर प्रवासाचे एक आणि रद्द केलेले एक तिकीट असे एकूण ६ हजार २२५ रुपये किमतीची रेल्वेची तिकिटे आढळली.
याशिवाय त्याच्याजवळ ३५0 रुपये रोख रक्कम होती. लगेच त्यास रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याच्याविरुद्ध रेल्वे अँक्ट १४३(ब)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची २0 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर सुटका केली. आरोपीला दोन महिने प्रत्येक सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुशीला अग्रवाल, विकास शर्मा यांनी केली. (प्रतिनिधी)