रेल्वेच्या धडकेत दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:55+5:302021-09-23T04:09:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : रेल्वेगाडीच्या धडकेत दाेन अनाेळखी व्यक्तींचा मृत्यू झाला. दाेघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळून ...

रेल्वेच्या धडकेत दाेघांचा मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : रेल्वेगाडीच्या धडकेत दाेन अनाेळखी व्यक्तींचा मृत्यू झाला. दाेघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळून आले. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इंजाेली शिवारात बुधवारी (दि.२२) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रेल्वे कर्मचारी लाईन क्रमांक ०२६९ वर पाेल क्र. ८०६/१० आणि १२ दरम्यान पटरीची पाहणी करीत असताना दाेन अनाेळखी व्यक्तींचे मृतदेह कटलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच बुटीबाेरी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. मृत व्यक्ती अंदाजे ४५ ते ५० वयाेगटातील असून, एकाच्या अंगात निळ्या रंगाचे टी-शर्ट, खाकी रंगाचा बरमुडा तर दुसऱ्याच्या अंगावर हिरवा टी-शर्ट, निळ्या रंगाचा बरमुडा परिधान केला असून, दाेघांचाही वर्ण गाेरा आहे. या वर्णनातील व्यक्तीबाबत माहिती असल्यास बुटीबाेरी पाेलीस ठाण्यात संपर्क साधावा. दाेन्ही मृत मजूर असल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.
220921\1947-img-20210922-wa0046.jpg
रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळले दोन अज्ञात मृतदेह