अपघातात दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST2020-12-09T04:07:53+5:302020-12-09T04:07:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू ...

अपघातात दाेघांचा मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमना परिसरातील पेट्राेल पंपाजवळ साेमवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
सूरज सुखदेव पाटील (२८) व ईश्वर माराेती पंधराम (३५) दाेघेही रा. डव्हा, ता. उमरेड, अशी मृतांची नावे आहेत. सूरज व ईश्वर हे दाेघेही एमएच-४०/बीझेड-७५१५ क्रमांकाच्या दुचाकीने सावेनर येथून डव्हा येथे गावी येत हाेते. दरम्यान, कळमना परिसरातील पेट्राेल पंपाजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दाेघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपी वाहनचालकाचा शाेध सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक सुचिता मंडावले करीत आहेत.