शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिलिंडरचा 'भडका' : विनाअनुदानित ९०५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 21:33 IST

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर नागपुरात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वधारले असून, ग्राहकांना फटका बसला आहे. आता ग्राहकांना भारत, इण्डेन, हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे सिलिंडर ९०५ रुपयात खरेदी करावे लागेल.

ठळक मुद्देसहा महिन्यात २८४ रुपयांची वाढ

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर नागपुरात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वधारले असून, ग्राहकांना फटका बसला आहे. आता ग्राहकांना भारत, इण्डेन, हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे सिलिंडर ९०५ रुपयात खरेदी करावे लागेल. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत १४५.५० रुपयांची वाढ झाली असून, दर अचानक वाढल्याने गृहिणींच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर ताण येणार आहे.आंतरराष्ट्रीय दरानुसार दर महिन्याच्या अखेरच्या तारखेला मध्यरात्रीनंतर गॅस सिलिंडरचे नवीन दर घोषित होतात. पण फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत जाणीवपूर्वक वाढ केली नाही. पण निकाल जाहीर होताच बुधवारी मध्यरात्रीनंतर वाढीव दरांची घोषणा केली. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १४५.५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे जानेवारीच्या ७५९ रुपये किमतीच्या तुलनेत आता गृहिणींना सिलिंडरसाठी ९०५ रुपये मोजावे लागेल.विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर जुलै २०१९ मध्ये ९९ रुपये आणिऑगस्टमध्ये ६३ रुपयांनी कमी झाल्यानंतर सप्टेंबरपासून पुन्हा वाढले होते. सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत तब्बल २८४ रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचा तुलनात्मक तक्ता पाहिल्यास जानेवारीत ७५९.५० रुपयाच्या तुलनेत १९०.५२ रुपये सबसिडी आणि फेब्रुवारीमध्ये अंदाजे ३३० रुपये सबसिडी बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्राने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही. ग्राहकांना वाढीव दरात सिलिंदर खरेदी करावे लागणार असले तरीही वाढीव दराएवढी सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. हे विशेष.सप्टेंबर २०१९ मध्ये विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६३७.५९ रुपये होते. ऑक्टोबरमध्ये वाढ होऊन ६५० रुपयावर पोहोचले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ७६.५० रुपयांची वाढ होऊन ७२६.५० रुपयावर गेले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा १४.५० रुपयाची वाढ झाली. जानेवारी २०२० मध्ये १९ रुपयाची वाढ होऊन दर ७६० रुपयावर पोहोचले. त्यानंतर ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री भाव १४५.५० रुपयांनी वाढून ९०५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीच्या क्रमामुळे दर लवकरच एक हजार रुपयावर पोहोचण्याचा अंदाज डीलर्सने व्यक्त केला.महिना-वर्ष          विनाअनुदानित गॅसफेब्रु. २०२०          ९०५जाने. २०२०         ७५९.५०डिसें. २०१९        ७४१नोव्हेंबर             ७२६.५०ऑक्टोबर          ६५०सप्टेंबर              ६३७.५०ऑगस्ट             ६२१जुलै                  ६८४जून                  ७८३मे                    ७५८.५४एप्रिल              ७५२.८३मार्च                ७०४.९६

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरInflationमहागाई