सिलिंडरचा 'भडका' : विनाअनुदानित ९०५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 09:25 PM2020-02-12T21:25:06+5:302020-02-12T21:33:28+5:30

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर नागपुरात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वधारले असून, ग्राहकांना फटका बसला आहे. आता ग्राहकांना भारत, इण्डेन, हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे सिलिंडर ९०५ रुपयात खरेदी करावे लागेल.

Cylinder 'hike': non-subsidized Rs 905 | सिलिंडरचा 'भडका' : विनाअनुदानित ९०५ रुपये

सिलिंडरचा 'भडका' : विनाअनुदानित ९०५ रुपये

Next
ठळक मुद्देसहा महिन्यात २८४ रुपयांची वाढ

लोकमत  न्यूज  नेटवर्क  
नागपूर : विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर नागपुरात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वधारले असून, ग्राहकांना फटका बसला आहे. आता ग्राहकांना भारत, इण्डेन, हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे सिलिंडर ९०५ रुपयात खरेदी करावे लागेल. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत १४५.५० रुपयांची वाढ झाली असून, दर अचानक वाढल्याने गृहिणींच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर ताण येणार आहे.
आंतरराष्ट्रीय दरानुसार दर महिन्याच्या अखेरच्या तारखेला मध्यरात्रीनंतर गॅस सिलिंडरचे नवीन दर घोषित होतात. पण फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत जाणीवपूर्वक वाढ केली नाही. पण निकाल जाहीर होताच बुधवारी मध्यरात्रीनंतर वाढीव दरांची घोषणा केली. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १४५.५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे जानेवारीच्या ७५९ रुपये किमतीच्या तुलनेत आता गृहिणींना सिलिंडरसाठी ९०५ रुपये मोजावे लागेल.
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर जुलै २०१९ मध्ये ९९ रुपये आणिऑगस्टमध्ये ६३ रुपयांनी कमी झाल्यानंतर सप्टेंबरपासून पुन्हा वाढले होते. सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत तब्बल २८४ रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचा तुलनात्मक तक्ता पाहिल्यास जानेवारीत ७५९.५० रुपयाच्या तुलनेत १९०.५२ रुपये सबसिडी आणि फेब्रुवारीमध्ये अंदाजे ३३० रुपये सबसिडी बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्राने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही. ग्राहकांना वाढीव दरात सिलिंदर खरेदी करावे लागणार असले तरीही वाढीव दराएवढी सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. हे विशेष.
सप्टेंबर २०१९ मध्ये विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६३७.५९ रुपये होते. ऑक्टोबरमध्ये वाढ होऊन ६५० रुपयावर पोहोचले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ७६.५० रुपयांची वाढ होऊन ७२६.५० रुपयावर गेले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा १४.५० रुपयाची वाढ झाली. जानेवारी २०२० मध्ये १९ रुपयाची वाढ होऊन दर ७६० रुपयावर पोहोचले. त्यानंतर ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री भाव १४५.५० रुपयांनी वाढून ९०५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीच्या क्रमामुळे दर लवकरच एक हजार रुपयावर पोहोचण्याचा अंदाज डीलर्सने व्यक्त केला.

महिना-वर्ष          विनाअनुदानित गॅस

फेब्रु. २०२०          ९०५
जाने. २०२०         ७५९.५०
डिसें. २०१९        ७४१
नोव्हेंबर             ७२६.५०
ऑक्टोबर          ६५०
सप्टेंबर              ६३७.५०
ऑगस्ट             ६२१
जुलै                  ६८४
जून                  ७८३
मे                    ७५८.५४
एप्रिल              ७५२.८३
मार्च                ७०४.९६

Web Title: Cylinder 'hike': non-subsidized Rs 905

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.