शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

महिला दिनानिमत्त जि.प.तील महिला पदाधिकाऱ्यांचे सायकलिंग

By गणेश हुड | Updated: March 8, 2023 15:35 IST

सायकल स्पर्धेत उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी पटकावला पहिला क्रमांक

नागपूर : जागतिक महिला दिवस व जागतिक लठ्ठपणा दिवसानिमत्त निरोगी आरोग्यासाठी सायक्लॉथानचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बुधवारी झिरो माईल येथे सकाळी महिलांची सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी पहिला क्रमांक मिळविला. दुसरा क्रमांक उप आयुक्त आरोग्य विभागातील जिल्हा स्तरीय गटप्रवर्तक दीपाली चांदेकर यांनी तर तिसरा क्रमांक उपसंचालक आरोग्य सेवा डॉ विनिता जैन यांनी मिळविला. प्रोत्साहनपर पारितोषिक विद्यार्थी निहारीका वाकोडकर व प्रशासकीय अधिकारी सुषमा बानिक यांना प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सर्व सहभागी महिला पदाधिकारी व महिला अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात आले.

सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रणात राहण्याला मदत होते. याचा विचार करता सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सायकल स्पर्धेतमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता विष्णू कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, आरोग्य विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाCyclingसायकलिंगnagpurनागपूरzpजिल्हा परिषद