शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

सोशल मीडियावर सायबरचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:08 AM

सोशल मीडियाचा गैरवापर करून सणासुदीच्या दिवसात धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाºया समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांचा सायबर सेल सूक्ष्म नजर ठेवून राहणार आहे.

ठळक मुद्देशांतता समितीची बैठक धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियाचा गैरवापर करून सणासुदीच्या दिवसात धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांचा सायबर सेल सूक्ष्म नजर ठेवून राहणार आहे. शांतताप्रिय आणि सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करणारे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. भविष्यातही ती तशीच राहील, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.नागपंचमीपासून सणोत्सवाला प्रारंभ होत आहे. ईद, रक्षाबंधन आणि त्यानंतर एकापाठोपाठ सणांची मालिका सुरू होईल. सणासुदीच्या कार्यकाळात सोशल मीडियाचा गैरवापर करून काही समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मोठ्याने डीजे वाजविणे, मिरवणुकीच्या वेळी विशिष्ट ठिकाणी जास्त वेळ थांबून गुलाल उधळणे, बॅण्ड, ढोल ताशे वाजवत गोंधळ घालणे, असे प्रकार करतात. यातून सामाजिक वातावरण दूषित होण्याचा धोका असतो. हा सर्व प्रकार होऊ नये म्हणून पोलीस कार्यरत असतातच मात्र विविध समाजातील सामाजिक नेते-कार्यकर्ते सक्रिय झाल्यास उपद्रवी मंडळी धाडस करत नाही. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी हॉटेल रजवाडा पॅलेसमध्ये शांतता समितीची शनिवारी बैठक घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय होते. तर,बैठकीतला आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रकाश गजभिये, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, शशिकांत महावरकर शहरातील विविध भागातील शांतता समितीचे सदस्य,महानगरपालिकेचे तसेच विविध विभागाचे शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.हल्लीचे युवक, तरुण, तरुणी सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय राहतात. त्यातून त्यांचे मन कलुषित करण्याचेही समाजकंटक प्रयत्न करतात. नैराश्य आल्याने अनेक नेटीजन्स आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष ठेवावे, अशी सूचना यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजनाचा उद्देश पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी प्रास्तविकातून विशद केला तर, उपायुक्त राहुल माकणिकर यांनी आपल्या खास शैलीने ‘पोलिसांनी काय केले पाहिजे’, त्याबाबत नागरिकांना बोलते केले.गणेशोत्सवापूर्वी करा रस्त्याची कामेमेट्रोच्या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतुकीत अडसर निर्माण होतो. मिरवणुकीच्या दिवशी मेट्रोची कामे बंद ठेवावी. मोठ्या वाहनासाठी वाहतुकीला प्रतिबंध करावा. पथदिवे आणि रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून गणेशोत्सवाच्या पूर्वी ही कामे पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी मान्यवरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. शांतता समितीच्या सदस्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्याचेही या बैठकीत ठरले.उपद्रवी मंडळींना आवराबैठकीत सहभागी विविध अधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी सणोत्सवाच्या कार्यकाळात उपद्रवी मंडळींचे काही अनुभव कथन केले. ईदच्या निमित्ताने प्राण्यांची वाहतूक केली जाते. काही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून ही वाहने अडवून नाहक त्रास दिला जातो. खंडणी वसुली किंवा पोलीस कारवाईचा धाक दाखवून वाद घातला जातो. हे प्रकार घडू नये, संवेदनशील परिसर, झोपडपट्ट्या, निर्जनस्थळी पोलिसांनी गस्त वाढवावी, असेही यावेळी अनेकांनी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया