शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने वारंवार घर सोडून जाणे क्रूरता

By admin | Updated: January 16, 2017 01:53 IST

पत्नीने कुणालाही न सांगता सासरचे घर वारंवार सोडून जाणे व अनेक दिवसांपर्यंत बाहेर राहणे ही कृती क्रूरतेच्या

हायकोर्टाचा निर्णय : पतीला घटस्फोट मंजूर नागपूर : पत्नीने कुणालाही न सांगता सासरचे घर वारंवार सोडून जाणे व अनेक दिवसांपर्यंत बाहेर राहणे ही कृती क्रूरतेच्या व्याख्येत मोडणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात देऊन पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. प्रकरणातील पती निखिल व पत्नी भावना हे नागपूर येथील रहिवासी आहेत (दोन्ही नावे काल्पनिक). भावनाला सासरचे घर वारंवार सोडून जाण्याची सवय होती. घर सोडून जाताना ती कुणालाही सांगत नव्हती. ती अनेक दिवस बाहेर राहिल्यानंतर घरी परत येत होती. ती निखिल व सासूसोबत सन्मानाने वागत नव्हती. घरची कामे करीत नव्हती. तिने निखिलचा विरोध असतानाही बँकेतून कर्ज घेऊन व स्वत:चे दागिने विकून ब्युटी पार्लर व मसाज सेंटर सुरू केले होते. तसेच, निखिल व त्याच्या जालना येथील भावाविरुद्ध ते हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पाणी डोक्यावरून गेल्यानंतर निखिलने भावनाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१० रोजी याचिका खारीज केली होती. या निर्णयाविरुद्ध निखिलने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे निर्णय देऊन निखिलचे अपील मंजूर केले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. निखिल व भावनाचे ७ मार्च १९९४ रोजी लग्न झाले होते. काही वर्षे दोघेही आनंदात राहिले. त्यानंतर भावनाने वाईट वागायला सुरुवात केली असे निखिलचे म्हणणे होते.(प्रतिनिधी)