क्रूड तेल आयात देशाला परवडणारी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:02+5:302020-12-09T04:08:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजच्या तारखेत देशाला इंधनासाठी ८० टक्के क्रूड तेल आयात करावे लागते. मुळात इतक्या मोठ्या ...

Crude oil imports are not affordable to the country | क्रूड तेल आयात देशाला परवडणारी नाही

क्रूड तेल आयात देशाला परवडणारी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आजच्या तारखेत देशाला इंधनासाठी ८० टक्के क्रूड तेल आयात करावे लागते. मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी आयात देशाला परवडणारीच नाही. ही देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

क्रूड तेलामुळे आर्थिक भारदेखील येतो व प्रदूषणदेखील वाढते. त्यामुळे जैविक इंधनाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. विशेषत: कृषी क्षेत्राला जैविक इंधन निर्मिती क्षेत्राकडे वळावे लागेल. तसेच इलेक्ट्रीक वाहनांचा उपयोगदेखील वाढवावा लागेल. इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे सुटे भाग आपल्याला चीनकडून आयात करावे लागतात. ऑटोमोबाईल कंपन्यांनी सहायक कंपन्या तयार करून हे सुटे भागही देशातच बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे सुट्या भागांची आयात कमी होईल. सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रिक इंधन किंवा सीएनजी, बायो सीएनजीवर चालविण्यात यावी, असेदेखील गडकरी म्हणाले

नागपूरभोवती ८०० किलोमीटर ब्रॉडगेज मेट्रो चालविणार

सार्वजनिक वाहतुकीसाठी ब्रॉडगेज मेट्रो हा पर्यायही परवडणारा आहे. नागपूरसभोवती ८०० किलोमीटर ब्रॉडगेज मेट्रो चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी रेल्वेची आणि महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

Web Title: Crude oil imports are not affordable to the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.