शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नागपुरात गारमेंट व कपड्याच्या दुकानांत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 9:08 PM

अनलॉकनंतर जून महिन्यात रेडिमेड गारमेंट आणि कपड्यांची दुकाने व शोरूम सुरू झाली असून ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तीन महिन्यानंतर ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर निघत आहे.

ठळक मुद्देअनलॉकनंतर लग्नकार्यासाठी खरेदी जोरात : दुकानदार घेताहेत ग्राहकांची काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकनंतर जून महिन्यात रेडिमेड गारमेंट आणि कपड्यांची दुकाने व शोरूम सुरू झाली असून ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तीन महिन्यानंतर ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर निघत आहे. ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नकार्य होणार असले तरीही लोकांची लग्नसराई उरकण्याची तयारी पूर्वीप्रमाणेच आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू देण्यासाठी साड्या आणि कपड्यांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये उत्साह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यावर दुकानदारांचा भर आहे. व्यवसाय वाढीसाठी विशेष योजना राबवित आहेत. सर्व दुकानांमध्ये आवश्यक सॅनिटायझर, मास्क व हॅन्डग्लोजचा उपयोग करण्यात येत आहे. १ जुलैपासून ऑड-इव्हनऐवजी नियमित दुकाने सुरू करावीत. सध्या कर्मचारी आणि दुकानाचा खर्च निघत असला तरीही पुढे व्यवसाय पूर्वीप्रमाणेच रुळावर येईल, असा विश्वास गारमेंट उत्पादक आणि विके्र त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

शालेय पोशाखांना मागणी वाढलीशाळा लवकरच सुरू होणार असल्याच्या वृत्ताने पोशाख विक्रेत्यांमध्ये उत्साह आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेला गारमेंट निर्मितीचा व्यवसाय अनलॉकमध्ये सुरू झाला आहे. नागपुरात ८ ते १० दुकानदार शाळांचे पोशाख तयार करतात. त्यांना शाळांच्या व्यवस्थापनातर्फे आॅर्डर येतात. हा व्यवसाय नागपुरात जवळपास १० कोटींचा आहे. यामुळे पोशाख तयार करणाऱ्या नागपुरातील ३०० कुटुंबाला रोजगार मिळाला आहे.अनलॉकमध्ये व्यवसाय वाढलाअनलॉकमध्ये कपड्यांची विक्री वाढल्याने व्यापाऱ्यांची हिंमत वाढली आहे. लग्नसराईचे ग्राहकही बाजारात दिसून येत आहे. प्रशासनाने दुकाने नियमितपणे सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे व्यवसाय आणखी वाढेल. प्रशासनाने जिल्हाबंदी हटवावी. त्यमुळे नागपूच्या व्यापाºयांना रोखीची कमतरता जाणवणार नाही.अजय मदान, अध्यक्ष, होलसेल क्लॉथ मार्केट.लग्नसराईसाठी खरेदी वाढलीअनलॉकमध्ये लग्नसराईची खरेदी वाढली असून ग्राहक दररोज खरेदीसाठी येत आहे. नवीन मालाची खरेदी करीत आहोत. १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या मान्सून सेलची तयारी सुरू आहे. लोक फोनवरून खरेदीसाठी विचारणा करीत असल्याने आमच्यातही उत्साह वाढला आहे. पुढे विक्री वाढेल.जुगलकिशोर भुतडा, संचालक, राजरी साडीज.खरेदीसाठी येताहेत ग्राहकअनलॉकमध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. युवकांकडून खरेदी वाढली आहे. लोकांमध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. ती दूर व्हावी. दुकाने नियमित सुरू झाल्यास ग्राहक बाजारात मोठ्या प्रमाणात येतील. शाळा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पोषाखांची विक्री वाढेल. पुढे व्यवसाय वाढणार आहे.ब्रिजेश अग्रवाल, संचालक, गेसन्स.दुकाने नियमित सुरू करावीरेडिमेड गारमेंट आणि कपड्यांची दुकाने ऑड-इव्हनऐवजी नियमित सुरू केल्यास बाजारात पूर्वीप्रमाणेच गर्दी होईल. अनलॉकनंतर उलाढाल वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सुरेश केवलरमानी, आरडी डिस्ट्रिब्युटर.कपड्यांची विक्री वाढलीअनलॉकमध्ये लोकांनी स्वत:हून कपड्यांची खरेदी सुरू केली आहे. बाजारात महिलांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी नवीन मालाची खरेदी करीत आहेत. शुभकार्य मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यास रेडिमेड गारमेंटची मागणी वाढेल. पण आताही ग्राहक उत्साहाने खरेदी करीत आहे. ही व्यापाऱ्यांसाठी जमेची बाजू आहे.अरविंदकुमार जैन, गारमेंट उत्पादक

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर