शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'पार्सल'च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे

By नरेश डोंगरे | Updated: April 1, 2024 22:17 IST

रेल्वेच्या पार्सल विभागावर नजर : तपासणी करणाऱ्या यंत्रणा 'अलर्ट'

नागपूर: निवडणूकीच्या निमित्ताने कोट्यवधींची रोकड ईकडून तिकडे होण्याची चर्चा झिरपल्यामुळे विविध यंत्रणांनी रेल्वेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या पार्सल विभागावर नजर रोखली आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसा सर्वत्र मुक्त हस्ते पैसा उधळला जातो. खास करून मोठ्या प्रमाणात काळा पैसा (ब्लॅक मनी) मोठ्या प्रमाणात बाहेर काढला जातो. या पैशाचा वापर दारू, खाणे-पिणे, वाहने तसेच अन्य सोयी सुविधा खरेदीसाठी केला जातो. ते लक्षात घेता मतदान प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालणाऱ्या ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणांसह पोलिसांनी प्रत्येक नाके आणि शहराला जोडणाऱ्या दुसऱ्या गावांच्या सिमांवर विविध वाहनांची तपासणी चालविली आहे. खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी मोठी रोकडही पकडण्यात आली आहे. पुढच्या काही तासात बसेसचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व लक्षात घेऊन मोठ्या रकमेची हेर-फेर करणाऱ्यांनी रेल्वेकडे नजर वळविली आहे.

विशेष म्हणजे, नागपुरात अशा प्रकारे कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर केल्या जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. कुरियर मॅन म्हणून काम करणारांच्या हातात मोठ्या रकमेचे पार्सल देऊन ते रेल्वे किंवा बसने पाहिजे त्या ठिकाणी पाठविण्यात येते. अनेकदा रेल्वेने वेगवेगळ्या बॉक्समध्ये, पिंपामध्येही लाखोंची रोकड भरूनही ती ईकडून तिकडे पाठविली जाते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या माणसांपर्यंत अशाच प्रकारे रक्कम पाठविण्यात येत असल्याची कुणकुण लागल्याने रेल्वे पोलिसांसह सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी नागपूर स्थानकावरील पार्सल विभागाची पाहणीही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना, आदेश देण्यात आले आहे.

अशीही क्लृप्ती !रोकड पकडली जाऊ नये, फारशी तपासणी होऊ नये म्हणून संबंधितांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. मिठाईचे किंवा चॉकलेटचे बॉक्समध्ये लाखोंची रोकड घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविली जाते. आता मात्र औषधांच्या बॉक्समध्ये रोकड घालून ती संबंधितांपर्यंत पोहचविण्याची क्लृप्ती संबंधितांनी अवलंबिली असल्याची चर्चा वजा माहिती आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरrailwayरेल्वे