टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:19 IST2020-05-30T19:17:26+5:302020-05-30T19:19:45+5:30
गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.

टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.
आधीच कोरोनाच्या विषाणूने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी टोळातील कीटक संकटात भर टाकणारे ठरणार आहेत. नाकतोड्याच्या आकारातील लाखोंच्या संख्येने असलेले किडे गावकऱ्यांना दिसल्याने एकच खळबळ उडाली. टोळधाड मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकºयांनी फवारणी केली, तिथे नुकसान दिसून येत नाही. टोळधाड आल्यानंतर टीन वाजविले, धूर केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होते. विभागाकडे प्राप्त नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार या टोळधाडीने भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी फळ पिकांचे नुकसान केले असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावांत ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत आहे. या टोळधाडीला नष्ट करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांचे थवे थांबल्यावर त्यांच्यावर कृषी विभागाकडून फवारणी करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.