१,०३६ शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांचे पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:23+5:302021-06-02T04:08:23+5:30
भिवापूर : खरीप हंगाम तोंडावर आहे. खते व बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. अशात बँकेकडून मिळणाऱ्या पीक ...

१,०३६ शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांचे पीक कर्ज
भिवापूर : खरीप हंगाम तोंडावर आहे. खते व बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. अशात बँकेकडून मिळणाऱ्या पीक कर्जावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. त्यामुळे बँकांनीही आता पीक कर्ज वितरणासाठी कंबर कसली आहे. ३१ मे पर्यंत तालुक्यातील १,०३६ शेतकऱ्यांना १० कोटी ५९ लाख ७६ हजार रुपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. ही टक्केवारी २८.७३ इतकी आहे. सध्या शेतकरी शेताची मशागत, खते व बियाणे खरेदीच्या कामात गुंतला आहे. तालुक्यात पीक कर्ज वितरणासाठी १३ बँका सज्ज आहेत. यात ९ बँका तालुक्यातील तर उमरेड तालुक्यातील ४ बँकांचा समावेश आहे. १ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वितरणास सुरुवात झाली. दरम्यान, ३१ मे पर्यंत १,०३६ शेतकऱ्यांना १० कोटी ५९ लाख ७६ हजार रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. बँक निहाय कर्ज वितरण पुढीलप्रमाणे आहे - स्टेट बँक ऑफ इंडिया, भिवापूर शाखेने २५ शेतकऱ्यांना२१ लाख ११ हजार रुपये, बँक ऑफ इंडिया, भिवापूर- १७२ शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख ८७ हजार रुपये, बँक ऑफ महाराष्ट्र, नांद- २९९ शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख २५ हजार रुपये, बँक ऑफ इंडिया कारगाव- ८६ शेतकऱ्यांना ८३ लाख ५५ हजार रुपये, युको बँक, सिर्सी- १०१ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये, बँक ऑफ महाराष्ट्र, उमरेड- ८८ शेतकऱ्यांना ८९ लाख रुपये, युनियन बँक, उमरेड- ३५ शेतकऱ्यांना ५५ लाख रुपये, आयडीबीआय बँक, बेसुर-४३ शेतकऱ्यांना ६५ लाख ७७ हजार रुपये, आयसीआयसीआय बँक, महालगाव- ७ शेतकऱ्यांना २७ लाख रुपये, आयसीआयसीआय बँक, जवळी- १० शेतकऱ्यांना १२ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक, भिवापूर- १०५ शेतकऱ्यांना १ कोटी १७ लाख ३ हजार रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक नांद- १३ शेतकऱ्यांना १५ लाख १६ हजार रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक,सिर्सी- ७ शेतकऱ्यांना ८ लाख ८७ हजार रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वितरित केले आहे. अशी माहिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे व सहायक निबंधक नरेश खोब्रागडे यांनी दिली.
शंभरीपार बँक
तालुक्यात कर्ज वितरण करणाऱ्या एकूण १३ बँकांपैकी नांद येथील बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज वितरणात प्रथमस्थानी आहे. या शाखेने २९९ शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख २५ हजार रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. बँक ऑफ इंडियाच्या भिवापूर शाखेने १७२ शेतकऱ्यांना, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भिवापूर शाखेने १०५ शेतकऱ्यांना तर युको बँक, सिर्सीने १०१ शेतकऱ्यांना कर्ज वितरण करत शंभरीपार केली आहे. मात्र, स्टेट बँक भिवापूर, आयसीआयसीआय बँक जवळी व महालगाव या शाखा कर्ज वितरणात मागे आहेत.