शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कोरोनाचे संकट अधिक गडद; मृत्यूचा आकडा हजारपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 08:30 IST

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्दे१२४२ नवे रुग्ण, ५० मृतांची नोंदरुग्णांची संख्या ३३१७२ तर मृतांची संख्या १०४३

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भावरील कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गुरुवारी मृतांच्या आकड्याने हजाराचा आकडा पार केला. यात ५० रुग्णांच्या मृत्यूची भर पडल्याने बळींची संख्या १०४३ वर पोहचली. १२४२ नवे रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या ३३१७२ झाली. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूसंख्येचे भयावह आकडे समोर येत आहे.  ९८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. रुग्णसंख्या १७७२२ झाली असून मृतांची संख्या ६२५ वर गेली आहे. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली. ११५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २४८२ झाली. चंद्रपूर जिल्ह्यात ५४ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२४९ तर मृतांची संख्या १३ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ४६ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. बाधितांची संख्या ५१२ वर पोहचली. बुलडाणा जिल्ह्यात ४२ रुग्ण व एकाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या २४३७ तर मृतांची संख्या ४१ झाली. गोंदिया जिल्ह्यात ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ९०२ झाली तर एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या १२ वर पोहचली. भंडारा जिल्ह्यात ३० रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णसंख्या ६९५ झाली. एका रुग्णाचा मृत्यूने मृत्यूची संख्या १० झाली. अमरावतीमध्ये २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या ४१६१वर गेली. या शिवाय, अकोल्यात १४, गडचिरोलीत १० रुग्णांची नोंद झाली, तर वाशिम जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही.मराठवाडा, खान्देशच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमीमराठवाडा, खान्देशच्या तुलनेत विदर्भात मृत्यूची संख्या कमी आहे. गुरुवारी खान्देशात १८०३, मराठवाड्यात १३०६ तर विदर्भात १०४३ मृत्यूची नोंद झाली. नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात कमी मृत्यू आहेत. नागपुरातील सहा जिल्हे मिळून ६७५ तर अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ३६८ मृत्यू झाले आहेत.-असा गाठला मृत्यूचा आकडा महिना मृत्यूसंख्या मार्च १एप्रिल १२मे ५४जून ९१जुलै २२९आॅगस्ट ६५६

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस