सराईत गुन्हेगार दाेन वर्षांसाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:18+5:302021-01-03T04:11:18+5:30
कामठी : शहरातील वारीसपुरा भागातील सराईत गुन्हेगारास पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांनी दाेनवर्षांसाठी तडीपार केले आहे. त्यास अमरावती येथे ठेवण्याचे ...

सराईत गुन्हेगार दाेन वर्षांसाठी तडीपार
कामठी : शहरातील वारीसपुरा भागातील सराईत गुन्हेगारास पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांनी दाेनवर्षांसाठी तडीपार केले आहे. त्यास अमरावती येथे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
माेहम्मद शाहीद ऊर्फ साजिद एजाज अन्सारी (वय ३६) असे आराेपीचे नाव असून, त्याच्यावर कामठीतील दाेन्ही पाेलीस ठाण्यांत विविध गंभीर गुन्ह्यांची नाेंद असून, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा केली आहे. मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. ताे सार्वजनिक व्यवस्थेस धाेकादायक ठरेल तसेच त्याच्यामुळे परिसरातील रहिवासी नागरिकांच्या मालमत्तेस नुकसान व भीतीचे वातावरण निर्माण हाेऊन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.तो गुन्हे करण्याची प्रवृत्ती सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याने पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांनी त्याला दाेन वर्षांसाठी तडीपार केले. या कालावधीत त्याला अमरावती येथील त्याच्या नातेवाइकाकडे पाठविण्यात आले आहे.