शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांसंदर्भातील न्यायालयीन कार्यवाहीत कुचराई का?

By admin | Updated: August 12, 2015 03:28 IST

राज्यातील विविध कारागृहांत बंद असलेल्या कैद्यांसंदर्भातील न्यायालयीन कार्यवाहीत कुचराई का केली जाते अशी

हायकोर्टाची विचारणा : गृह विभागाच्या सचिवांना नोटीसनागपूर : राज्यातील विविध कारागृहांत बंद असलेल्या कैद्यांसंदर्भातील न्यायालयीन कार्यवाहीत कुचराई का केली जाते अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी करून यासंदर्भात गृह विभागाचे सचिवांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.कारागृहांतील अनेक कैद्यांनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केलेले नसते. अशा कैद्यांना योग्य मार्गदर्शन करणे व त्यांचे अपील उच्च न्यायालयात सादर करण्याची जबाबदारी करागृह अधीक्षकांची असते. परंतु, हे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडले जात नसल्यामुळे कैद्यांना कारागृहात खितपत पडून राहावे लागते. अपील न केल्यामुळे अनेक वर्षांपर्यंत कारागृहात बंद राहिलेल्या एका महिला कैद्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात आले होते. अपील केल्यानंतर ही महिला निर्दोष सुटली होती. यावेळी न्यायालयापुढे जून-२०१३ मध्ये मृत्यू झालेल्या पण, अपील प्रलंबित असलेल्या कैद्याचे प्रकरण आले. या सर्व परिस्थितीचा विचार करता न्यायालयाने शासनाला वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.भगवंत कृष्णराव सरोदे असे मृत कैद्याचे नाव असून तो चिखली (यवतमाळ) येथील रहिवासी होता. त्याच्यावर पत्नी भाग्यश्रीची हत्या केल्याचा आरोप होता. २४ मे २०१२ रोजी दारव्हा सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याने उच्च न्यायालयाला पत्र पाठवून अपील सादर केले होते. हे अपील यावर्षी अंतिम सुनावणीसाठी आले असता न्यायालयाने शासनाला नोटीस बजावली. त्यावर शासनाने या कैद्याचा जून-२०१३ मध्ये मृत्यू झाल्याची माहिती दिली. परिणामी न्यायालय संतप्त झाले. अपील प्रलंबित असताना कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती न्यायालयाला देणे आवश्यक आहे. असे न केल्यामुळे न्यायालयाचा वेळ व्यर्थ गेला. शासनाच्या या उदासीनतेवर न्यायालयाने ताशेरे ओढले. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)