मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: January 21, 2017 02:19 IST2017-01-21T02:19:50+5:302017-01-21T02:19:50+5:30
जऊळका रेल्वे येथील घटना.

मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
जऊळका रेल्वे, दि. २0- गाडी का दुरुस्त केली नाही, या कारणावरुन वाद घालुन ३५ वर्षीय युवकाला जबर मारहाण केल्याची घटना नागरदास पुलाजवळ घडली. याप्रकरणी सुकांडा येथील दोघांवर जऊळका रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सुकांडा ता.मालेगाव येथील रमेश आंधळे (वय ३५) याने जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, मोटार सायकलने येत असतांना नागरदास पुलावर सुकांडा येथील गणेश घुगे, दादाराव घुगे यांनी गाडी थांबवून, तु आमची गाडी दुरुस्त का करुन दिली नाही, यावरुन वाद घालुन थापडा बुक्यांनी मारहाण केली तसेच गाडी व मला लोटून दिले, असे आंधळे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यामुळे गाडीसह खाली पडल्यामुळे डोके, नाकाला मार लागला असून, खांद्याला फॅक्चर झाले, असा वैद्यकीय अहवाल आहे.वैद्यकीय अहवाल व जबानी तक्रारीवरून गणेश घुगे, दादाराव घुगे रा.सुकांडा या दोघाविरुध्द कलम ३२५, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बिट जमादार विलास ताजणे करीत आहेत.