शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरातील गुन्हेगार दत्तक योजना बासनात गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:29 AM

शहर पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली गुन्हेगार दत्तक योजना अनेक पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे.

ठळक मुद्देमैत्रीपूर्ण ‘व्यवहारा’मुळे गुन्हेगार निर्ढावलेगंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली गुन्हेगार दत्तक योजना अनेक पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगार निर्ढावले आहेत. त्याचमुळे हत्या, हत्येचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर गुन्हे सारखे वाढत आहेत. सुरू असलेल्या जून महिन्यात घडलेल्या मोठमोठ्या गंभीर गुन्ह्यांमुळे उपराजधानीत पुन्हा गुन्हेगारी वळवळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी अनेक उपक्रम राबविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. शहरातील तीन हजारांवर गुन्हेगारांची सचित्र माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देण्यात आली. हे गुन्हेगार काय करतात, कुठे जातात, कुठे बसतात, त्यांचा उदरनिर्वाह सध्या कसा सुरू आहे, यासंबंधीची बारीकसारीक माहिती काढून त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना काही महिन्यांपूर्वी नागपुरात सुरू करण्यात आली होती. त्यानुसार, छोटे-मोठे गुंड रोज घरी आहे की नाही, ते तपासण्यासाठी ‘सेल्फी’योजनाही सुरू करण्यात आली होती. ती काटेकोरपणे राबविण्यात येईपर्यंत शहरातील गुन्हेगारी नियंत्रित होती. मात्र, अनेक पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चिरीमिरीसाठी ही योजना बासनात गुंडाळली.अवैध धंद्यांना मूकसंमती देत गुन्हेगारांना रान मोकळे करून दिले. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. त्याचमुळे ते शहराच्या रस्त्यांवर खुनाचा सडा घालत आहेत. महिना संपायला अजून आठवडा आहे. मात्र, सुरू असलेल्या जून महिन्यात मोठमोठे हत्याकांड शहरात घडले आहेत. त्यातील चमचम हत्याकांड, तेवर हत्याकांड, शेरा हत्याकांड, विजय मोहोड हत्याकांड आणि बाबा चौधरी हत्याकांडाचा उल्लेख करता येईल. उपरोक्त हत्याकांडापैकी तेवर हत्याकांड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडले तरी मृत आणि त्याची हत्या करणारे गुन्हेगार शहरातीलच आहेत.हे सर्वच्यासर्व गुन्हे पोलिसांच्या रेकॉर्डवर खतरनाक गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या कुख्यात गुंडांनी केले आहेत. त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जात नसल्यामुळेच हे गुन्हे घडत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांची गय करू नका, असे आदेश दिले आहेत.मात्र, अनेक पोलीस ठाण्यातील मंडळी या गुन्हेगारांकडून महिन्याला तगडी रक्कम मिळावी म्हणून त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध जोपासत आहेत.अनेक गुन्ह्यात लाखोंची तोडपाणी करण्यासाठी याच गुन्हेगारांकडून मांडवली करवून घेत आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगारांना पोलीस मित्रांसारखे वाटू लागले आहेत. पोलिसांची भीती उरली नसल्यामुळे गुन्हेगार निर्ढावत आहेत आणि रान मोकळे झाल्यासारखे ते गंभीर गुन्हे करीत फिरत आहेत.

वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलनापोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व पोलीस उपायुक्त असे शहरातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्राच्या पोलीस ठाण्यातील मंडळींना नियमित दिशानिर्देश देत आहेत. अनेक गुंडांच्या टोळ्यांवर मोक्का, एमपीडीए, तडीपारीची कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्तांनी चार दिवसांपूर्वी शहरातील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी अनेकांचे कान टोचले. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांनीही तीन दिवसांपूर्वी ठाणेदारांना कडक सूचना दिल्या. मात्र, खाबूगिरीसाठी चटावलेले अनेक ठाणेदार आणि त्यांच्या अधिनस्थ मंडळी पुरेशी काळजी घ्यायला तयार नाही. ते वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करीत आहेत. गुन्हेगारांबाबत कडक धोरण राबवायची त्यांची मानसिकता नसल्यामुळेच उपराजधानीतील गुन्हेगारी वाढत आहे.

शस्त्रे घेऊन फिरणारे दिसत का नाही ?वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना योग्य साधन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पुरेसे नसले तरी बºयापैकी प्रत्येक पोलीस ठाण्यात मनुष्यबळ आहे. त्यांनी गुन्हेगारांवर वचक बसवावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत काढला चाकू आणि भोसकले कुणाला, असे प्रकार घडत आहेत. अर्थात शहरात अनेक गुन्हेगार बिनबोभाट शस्त्रे घेऊन फिरत असल्याचे या गुन्ह्यांमधून अधोरेखित होत आहेत. गुन्हेगार जर असे बेदरकारपणे फिरत असेल तर पोलिसांना ते का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केलो जात आहे. वाहतूक शाखेचे पोलीस नुसते सिग्नल तोडणारांकडे नजर लावून असतात. त्यांना आणि गस्त घालणाºया पोलिसांना शस्त्रे घेऊन फिरणारे गुन्हेगार का दिसत नाही, असाही प्रश्न उपराजधीकरांना सतावत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी