वाढत्या रेल्वेगाड्यांसोबत क्राईम रेटही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST2020-12-12T04:26:47+5:302020-12-12T04:26:47+5:30
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. हळुहळू रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ ...

वाढत्या रेल्वेगाड्यांसोबत क्राईम रेटही वाढला
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. हळुहळू रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ झाली. सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ९० रेल्वेगाड्या सुरु आहेत. रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असताना रेल्वेगाड्यात गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. प्रवाशांचे मोबाईल आणि महागड्या वस्तू ते पळवित असल्यामुळे या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
रेल्वेगाड्यात हळुहळू गुन्हेगार सक्रिय होत आहेत. लॉकडाऊनमध्ये रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे गुन्हेगारही कमी झाले होते. परंतु रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून सध्या ९० रेल्वेगाड्या धावत आहेत. रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेत असामाजिक तत्वही सक्रिय झाले आहेत. रेल्वेत सर्वाधिक चोऱ्या धावत्या रेल्वेगाड्यात होत आहेत. प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन हे गुन्हेगार त्यांचे महागडे मोबाईल, बॅग, इतर साहित्य पळवित आहेत. यात अनेकदा बॅगमध्ये ठेवलेली रक्कमही हे चोरटे लंपास करीत आहेत. परंतु बहुतांश रेल्वेगाड्यात पोलिसांची स्कॉटींग राहत नाही. याचा फायदा हे गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हेगारांचा बंदोबस्त लावण्यासाठी रेल्वेगाड्यात स्कॉटींग वाढविण्याची मागणी होत आहे.
..............
घडलेले गुन्हे लॉकडाऊन पूर्वी
मार्च ४, एप्रील १, मे ४, जुन ४
लॉकडाऊननंतर घडलेले गुन्हे
जून ४, जुलै ३, ऑगस्ट ४, सप्टेंबर ०, ऑक्टोबर ०, नोव्हेंबर ४
............