शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नागपूर गुन्हे शाखेची क्रिकेट अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:50 AM

गुन्हे शाखेच्या पथकाने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वराजनगरात सुरू असलेल्या एका सट्टा अड्ड्यावर बुधवारी रात्री धाड घातली. येथून पोलिसांनी चार बुकींना जेरबंद केले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल आणि सट्ट्याची खायवाडी करणारे साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देचार बुकी गजाआड : मोबाईल, टीव्हीसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वराजनगरात सुरू असलेल्या एका सट्टा अड्ड्यावर बुधवारी रात्री धाड घातली. येथून पोलिसांनी चार बुकींना जेरबंद केले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल आणि सट्ट्याची खायवाडी करणारे साहित्य जप्त केले.अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेसा मार्गावरील इंद्रप्रस्थ सोसायटी आहे. येथील गजानन क्लासिक कॉम्प्लेक्समधील चौथ्या माळ्यावर असलेल्या ४०१ क्रमांकाच्या सदनिकेत सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने बुधवारी रात्री ८.२० ला तेथे छापा घातला. यावेळी तेथे योगराज शंकर काकडे (वय ३४, रा. स्वराज नगर, अजनी), कुणाल वसंतराव साबळे (वय १९, रा. नंदनवन) मोनू ऊर्फ बालाजी आणि सुभाष हे बुकी राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर खायवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाईल आणि टीव्ही सह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, एसीपी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक प्रदीप अतुलकर, मनीष वाकोडे, उपनिरीक्षक राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.कोण आहेत एस आणि दादा?पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात आकड्याच्या नोंदीची काही कागदही आढळले. त्यातील एका कागदावर १ तारखेपासूनचा सट्ट्याचा हिशेब आणि एस तसेच दादा असे लिहिले आहे. अर्थात  हे कोडवर्ड आहेत. ते कुणासाठी वापरले त्याचा गुन्हे शाखा तपास करणार असली तरी ती नावे उघड होईल का, असा प्रश्न आहे. पोलिसांनी ज्या चार बुकींना अटक केली. त्यातील दोघांची नावेही पोलिसांनी अर्धवटच प्रसिद्धीला दिली आहे, हे विशेष ! 

 

टॅग्स :Cricketक्रिकेटCrimeगुन्हा