शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर मुस्लीम धर्माचा अवमान - चार आरोपींविरुद्ध नोंदविला गुन्हा

By admin | Updated: July 1, 2014 00:56 IST

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे अपलोड करून मुस्लीम धर्माचा अनादर करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (अ) व २९५(अ) आणि माहिती तंत्रज्ञान

नागपूर : फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे अपलोड करून मुस्लीम धर्माचा अनादर करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (अ) व २९५(अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(अ) व ६७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. संजय शर्मा, हनी उपाध्याय, चंदन कुमार व प्रवीण सिंग अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींचे फेसबुक अकाऊंटही बंद करण्यात आले आहे. यशोधरानगर येथील फहीम शमीम खान, वर्धमाननगर येथील मुफ्ती मुजतबा शरीफ खान, योगेंद्रनगर येथील मौलाना मोहम्मद फैझ अहमद व महाल येथील मौलाना मोहम्मद अतिकर रहमान सिद्दीकी यांनी यासंदर्भात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. १० एप्रिल रोजी मुंबई येथील शाहीद समीर यांनी फेसबुकवर काही चांगली धार्मिक छायाचित्रे टाकली होती. त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते. परंतु दोन दिवसांनी आरोपी संजय शर्मा, हनी उपाध्याय, चंदन कुमार व प्रवीण सिंग यांनी छायाचित्रांबाबत अवमानजनक प्रतिक्रिया नोंदविणे सुरू केले. याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात १६ एप्रिल रोजी यशोधरानगर पोलिसांकडे लिखित तक्रार दिली. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची विनंती त्यांनी केली होती. दरम्यान, यशोधरानगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिका निकाली काढली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)