क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा :इतवारीतील दोन बुकी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 21:45 IST2020-11-06T21:42:52+5:302020-11-06T21:45:01+5:30
Police raid on Cricket satta den, crime news गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने गुरुवारी रात्री इतवारीतील एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा घातला.तेथे दोन बुकींना अटक करून त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल दुचाकीसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा :इतवारीतील दोन बुकी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने गुरुवारी रात्री इतवारीतील एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा घातला.तेथे दोन बुकींना अटक करून त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल दुचाकीसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
बादल अंबादास अडवाणी (वय ४०, रा. गांधी पुतळा, नवीन इतवारी) आणि कैलास प्रभाकर मुंडरीकर (वय ३५, रा. शिवाजीनगर) अशी
अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत. बादल आणि कैलास अनेक दिवसापासून क्रिकेट सट्टा घेतात. गुरुवारी रात्री हे दोघे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअर डेव्हील दरम्यान दुबईत सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे छापा घातला. त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरलेले मोबाईल, टीव्ही आणि ॲक्टिव्हासह एक लाख, ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलींग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनोद चौधरी, सहायक निरीक्षक योगेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
कटिंग सुरूच
पोलीस आयुक्तांनी बड्या बुकींना ‘मुहतोड’ इशारा दिल्यानंतरही अनेक बुकी सक्रिय आहेत. सध्या सर्वांची कटिंग (उतारी) गोव्यात होत असल्याची चर्चा आहे.