कामठीत सापडला क्रिकेट सट्टा : वाहनासह तीन लाखाचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:07 IST2019-05-14T00:07:10+5:302019-05-14T00:07:52+5:30

झोन - ५च्या चमूने कामठीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना अटक केली.

Cricket betting in Kamthi : Three lakhs of goods seized with the vehicle | कामठीत सापडला क्रिकेट सट्टा : वाहनासह तीन लाखाचा माल जप्त

कामठीत सापडला क्रिकेट सट्टा : वाहनासह तीन लाखाचा माल जप्त

ठळक मुद्देलॅण्ड डेव्हलपर्सच्या घरी अड्डा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोन - ५च्या चमूने कामठीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना अटक केली.
प्रवीण कट्टू काळे (३६), मच्छिंद्र श्रीराम पोटभरे (४९), विजय मधुकर महाजन (२७) आणि प्रमोद कडू (२६) रा. लालगंज शांतिनगर, अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी कामठीतील यशोदानगर येथील लॅण्ड डेव्हलपर्स रामचंद्र वंजारीच्या फ्लॅटवर आरोपी क्रिकेट सट्ट्याचा अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. तेव्हा आरोपी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या सामन्यावर सट्टेबाजी करीत होते. आरोपी टीव्हीच्या माध्यमातून सट्टेबाजी करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून वाहनासह तीन लाख रुपयाचा माल जप्त केला.
ही कारवाई डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पी.आर. साखरे, हवालदार पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, आमरिन आणि सतीश ठाकूर यांनी केली.

 

Web Title: Cricket betting in Kamthi : Three lakhs of goods seized with the vehicle