नागपुरातील जरीपटक्यात क्रिकेट सट्टा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:54 IST2019-01-22T00:53:03+5:302019-01-22T00:54:55+5:30
जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

नागपुरातील जरीपटक्यात क्रिकेट सट्टा अड्डा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, अष्टविनायक अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळयावर कुख्यात बुकी अजय वाडे, मंजित वाडे हा सट्टा अड्डा चालवीत होता. त्याची माहिती कळताच जरीपटका पोलिसांनी सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास या अड्ड्यावर छापा मारून अजय वाडे, मंजित वाडे, अनिल तिवारी, राजकुमार पांडे, नितीन लोहकरे आणि विशाल चढ्ढा या बुकींना पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ११ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यासंबंधाने वारंवार विचारणा करूनही जरीपटका पोलिसांकडून रात्रीपर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती.