शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कृती आराखडा तयार

By admin | Updated: April 8, 2016 02:52 IST

एलबीटी रद्द झाल्याने मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता विभागावर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.

मालमत्ता विभाग : त्रुटींची सुधारणा, ३० एप्रिलपर्यंत सर्वांना डिमांड गणेश हूड नागपूर एलबीटी रद्द झाल्याने मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता विभागावर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. क रवसुली प्रणालीतील त्रुटी दूर करून मालमत्ताधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी मालमत्ता विभागाने २०१६-१७ या वर्षाचा सर्वसमावेशक असा नवीन कृती आराखडा तयार केला आहे. नवीन पद्धतीनुसार मालमत्ताधारकांना स्वत:च्या मालमत्तांचे स्वयंमूल्यांकन करण्याचा पर्याय दिला आहे. ३१ मार्चपूर्वी स्वयंमूल्यांकन अर्जासह कर भरल्यास १० टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार ज्या लोकांनी या तारखेपूर्वी अर्ज दाखल करून कर भरलेला आहे. त्यांना ही सवलत देण्यात आली. ३० एप्रिलपर्यंत मालमत्ताधारकांना नवीन कर आकारणीच्या आधारावर देयके दिली जाणार आहे. ३१ मेपर्यंत पूर्ण वर्षाचा कर भरणाऱ्यांना मालमत्ता करात चार टक्के सूट तर सहा महिन्याचा कर भरणाऱ्यांना दोन टक्के सूट कायम आहे. मालमत्ताकरासोबत आमपाणी कर लागून येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तो लागून येऊ नये यासाठी कर आकारणी व करवसुली विभागाने जलप्रदाय विभागाकडून नळजोडणी धारकांची यादी मागविली आहे. त्यानुसार पडताळणी करून चुकीच्या नोंदी रद्द करून नवीन केल्या जातील. त्यानुसार पुढील देयके पाठविली जाणार आहेत.अनेक कॉम्प्लेक्सचा निवासी व व्यापारी असा संयुक्त वापर केला जातो. अशा इमारतीत स्वतंत्र नळ जोडणी न घेता एटीएम, दवाखाना वा दुकान असल्यास त्यांना पाण्याची देयके पाठविली जाणार नाही. परंतु त्यांनी या संदर्भात जलप्रदाय विभागाकडे नोंदणी करून दर महिन्याला पाण्याचे शंभर रुपये भरावे लागतील. ज्या मालमत्ताधारकांनी मॅन्युअली कर भरलेला आहे. त्यांना पुढील वर्षाच्या देयकात जुना कर जोडून येऊ नये यासाठी ई- गव्हर्नन्स प्रणालीत नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. नवीन आराखडा सर्वसमावेशक व पारदर्शी राहील. कर विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असून मालमत्ताधारकांच्या मनातील संभ्रम दूर क रून त्यांचे समाधान होईल, अशी ग्वाही कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. बेसरेटच्या आधारावर कर आकारणी केली जात आहे. ज्या मालमत्ताधारकांनी कर भरलेला आहे. त्याना पुढील देयकात नियमित करासोबतच वाढीव कर लागू झाल्यापासूनच्या फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या देयकात ही रक्कम लागून येणार आहे.