न्यायालयात कामकाजाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST2020-12-03T04:17:32+5:302020-12-03T04:17:32+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व सत्र न्यायालयात मंगळवारपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्याने ...

न्यायालयात कामकाजाला सुरुवात
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व सत्र न्यायालयात मंगळवारपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्याने वकिलांनीही समाधान व्यक्त केले.
एसओपीनुसार उच्च न्यायालयात कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांना नंबर दिला गेला होता. केवळ त्याच वकिलांना आत प्रवेश दिला गेला, ज्यांचा नंबर आला होता. न्यायालयात गर्दी होणार नाही, यासाठी दोन सत्रात कामकाज केल्या गेले. पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत व दुसरे सत्र दुपारी दुपारी २ ते ४ पर्यंत कामकाज झाले. त्यानुसार रोजच्या कामकाजाला दोन सत्रात वाटण्यात आले.
सत्र न्यायालयातसुद्धा आजपासून नियमित कामाला सुरुवात झाली. गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाचे महाव्यवस्थापक एस. जी. दिघे यांनी कामकाज सुरू करण्यासंदर्भात नवीन एसओपी जारी केला. त्या अंतर्गत न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी १.३० व दुपारी २ ते ४.३० पर्यंत नियमित कामकाज झाले. नियमित कामकाजाच्या पूर्वी न्यायिक अधिकारी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. वकिलांनी नियमित कामकाज सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले. अॅड. मीर नगमान अली म्हणाले, न्यायालयात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनेचे पालन केले जात आहे. सर्वांना मास्क अनिवार्य केले आहे. अॅड. अतुल रावलानी म्हणाले, उच्च न्यायालयात ज्या वकिलांच्या केसेस होत्या. त्यांना आत पाठविण्यात आले. सत्र न्यायालयात गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आले. कामानिमित्त आलेले वकील व पक्षकारांना आत पाठविण्यात आले. पक्षकार न् आल्याने पुरावे दाखल होऊ शकले नाही. केवळ जमानतीच्या संदर्भातील प्रकरणावर सुनावणी झाली.