लैंगिक छळाच्या आरोपातील विस्तार अधिकाऱ्याला न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 08:09 PM2017-12-05T20:09:05+5:302017-12-05T20:13:00+5:30

Court bans extension authority for sexual assault | लैंगिक छळाच्या आरोपातील विस्तार अधिकाऱ्याला न्यायालयाचा दणका

लैंगिक छळाच्या आरोपातील विस्तार अधिकाऱ्याला न्यायालयाचा दणका

Next
ठळक मुद्देविशेष न्यायालय : अटकपूर्व जामीन नाकारलानागपूर जिल्ह्यातील रामटेक भागातील प्रकार








आॅनलाईन लोकमत

नागपूर : अनुसूचित जमातीच्या एका ग्रामसेवक महिलेचा लैंगिक आणि जातीय छळ केल्याचा आरोप असलेल्या रामटेक पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकाºयाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
चंद्रशेखर माधवराव पाटील (५५) रा. ईश्वरनगर नंदनवन, असे आरोपी विस्तार अधिकाºयाचे नाव आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून १६ नोव्हेंबर २०१७ रोजी रामटेक पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५४, ३५४(अ), ३५४(ड) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२)(व्ही)(ए), ३(१)(डब्ल्यू)(ए), ३(१)(डब्ल्यू)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी विस्तार अधिकारी हा पीडितेला आपल्या कार्यालयात बोलावून तसेच वारंवार पीडितेच्या कार्यालयात जाऊन एकटक पाहायचा. लैंगिक भावनेने वारंवार मोबाईलद्वारे व्हॉटस्अपवर शेरोशायरीचे एसएमएस पाठवायचा. बदनामी करून मानसिक छळ करायचा. पीडित महिला ही अनुसूचित जमातीची असल्याने तिच्याकडे खालच्या नजरेने पाहायचा.
गुन्हा दाखल होताच आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. प्रकरण गंभीर असल्याने आरोपीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील प्रशांत साखरे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी रामटेक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहित मतानी हे आहेत.

Web Title: Court bans extension authority for sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.